vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

 

जालना (प्रतिनिधी) : वंदेमातरम् या राष्ट्रगीताने गौरवशाली १५० वर्ष पूर्ण केले, १९७५ मध्ये बक्किमचंद्र चटर्जी (चटोपोध्याय) यांनी हे गीत रचले होते, स्वातंत्र्याच्या चळवळीत प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये या गीताने राष्ट्रभक्तीची भावना निर्माण केली. असे त्यांनी आज दि ०७ नोव्हेंबर रोजी जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालय जिल्हा जालना येथे वंदेमातरम् गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, राजेश राऊत, विमलताई आगलावे, विजय कामड, शुभांगीताई देशपांडे, संध्याताई देठे, अरुणाताई जाधव, सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलीये, रमेश गौरक्षक, शिवप्रकाश चितळकर, सुनील खरे, महेश निकम, संजय डोंगरे, अमोल करंजेकर, श्रीमंत मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या गीतामुळे स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन मातृभूमीची रक्षा करण्यास सज्ज झाले. वंदेमातरम् या शब्दाचा अर्थ म्हणजे मी मातेला वंदन करतो आहे. १८९६ मध्ये कॉंग्रेसच्या अधिवेशनास रविंद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम हे गीत गायले व त्यानंतर हे गीत सार्वजनिक झाले. रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायल्या नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत या गीताने महत्वाची भूमिका बजावली. ब्रिटिशांनी या गीतावर बंदी आणली कारण त्यांना हे गीत भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे प्रतिक वाटत होते. सन १९०५ स्वदेशी चळवळीपासून ते १९४२ च्या भारत छोडो आंदोलनापर्यंत प्रत्येक आंदोलनात हे गीत वाजत होते. स्वातंत्र्यसेनानी जेंव्हा रस्त्यावर उतरत होते तेंव्हा वंदेमातरम् जयघोष करून जनता त्यांना प्रोत्साहन देत होती. व स्वातंत्र्यसेनानी यांनी या गीताला आपल्या चळवळीचा आधार बनविले. असे हे वंदेमातरम् दोन शब्द ऐकताच प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत होते असे त्यांनी सांगितले.

यावेळी सौ.शुभांगीताई देशपांडे, भावना मुळे, श्रीमंती रेणूताई घन, सौ.विशाखा नाईक यांनी वंदेमातरम् गीत, महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत यांनी गायले.यावेळी या कार्यक्रमास विद्याताई कुलकर्णी, दीपा बिनीवाले, निलावती धावणे, विद्या देशमुख, अरुणा फुलमामडीकर, अश्विनी देशपांडे, वैशाली बनसोडे, पुष्पा मेहेत्रे, वर्षा ठाकूर, स्नेहा जोशी, सुरेखा बोटुळे, चंपालाल भगत, देविदास देशमुख, राजेश जोशी, रवी अग्रवाल, आनंद वाघमारे, विष्णू डोंगरे, बाबा उगले, गोवर्धन कोल्हे, सुभाष सले, बाबुराव भवर, शिवराज जाधव, किरण इंगळे, महादेव कावळे, सतीश अकोलकर, सोमेश काबलिये, सोपान पेंढारकर, रामलाल जाधव, प्रमोद गंडाळ, भागवत बावणे, कपिल दहेकर, दुर्गेश कुरील, राजेंद्र भोसले, आनंद झारकंडे, डोंगरसिंग साबळे, रोशन चौधरी, नेमीचंद भूरेवाल, तुलजेश चौधरी, राजू गवई, महेंद्र अकोले, सुहास मुंडे, गोविंद चीलवर, अविनाश देशपांडे, सतीश प्रभू, रणजीत रीडला, नागेश बेनिवाल, जितेंद्र संचेती, सेवाकराम नारीयलवाले, विकास कदम, रोहित खोडवे, सुदर्शन काळे, उमेश पेंढारकर, रोहित नलवडे, गौरव ठाकूर, अॅड. भगवान चांदोडे, गोविंद ढेंबरे, नागेश अंभोरे इत्यादीसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित पोस्ट

जाहीरात विषयक जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

अमृततर्फे मोफत ड्रोनपायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधीDGCA मान्यता प्राप्त प्रशिक्षणातून युवकांना नवे करिअर घडविण्याची संधी…

vishwatmaklokswamivarta

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*

पाकिस्तानचा सतत सीमेवर जोरदार गोळीबार, अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित, भारताकडून चोख प्रत्युत्तर

आंबेनळी घाट अपघात: मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करा;पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा व रायगड जिल्हा प्रशासनाला निर्देश

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्राम विकासासाठी शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन