vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संस्कार ‘च्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली क्षेत्रभेटीतून उद्योगांची माहिती

संस्कार ‘च्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली क्षेत्रभेटीतून उद्योगांची माहिती

जालना, (प्रतिनिधी) -जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीच्या माध्यमातून शहरातील अ‍ॅप्राक्रॉप,अ‍ॅप्राकुल ए सी(वातानुकूलन)कारखान्याला भेट देऊन उद्योग क्षेत्राची प्रत्यक्षात माहिती जाणून घेतली.संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कारखान्यात नेऊन उद्योग क्षेत्राची माहिती देऊन अनोखा उपक्रम राबवला आहे.यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष एसी कसा तयार होतो, त्यासाठीकोणकोणत्या वस्तूंचा वापर होतो,या संदर्भातील सविस्तर माहिती कारखान्यालाभेट देऊन जाणून घेतली.ए सी मध्ये मोठ्या प्रमाणावर तांबे वापरल्याजाते,कारण तांबे खराब होत नाही,आणि त्याला गंज लागत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तांब्याचा वापर एसी मध्ये केला जातो.शहरातील अ‍ॅप्राक्रॉप,अ‍ॅप्राकुल कंपनी भारतातील गोदरेज,एलजी, व्होल्टास अशा नामांकित कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर ए सी तील सर्व सुटे भाग पुरवतात.तसेच रेल्वेतील ए सी,आणि मोठ्या ठिकाणी आठटना पेक्षा मोठ्या ए सी तील सर्व सुटे भाग याच कारखान्यातून पुरवल्या जातात.शहरातील ए सी तयार करणार्‍या कंपनीत प्रत्यक्षात एसी तयार करताना बघून विद्यार्थी भारावले होते. कंपनीचे प्रमुख उद्योगपती जितेंद्र राठी,व्यवस्थापक मारुती कल्याणकस्तुरे,दशरथ फड,एजाज मनियार आणि कंपनीतील अभियंते यांनी

विद्यार्थ्यांना ए सी संदर्भातील सर्व माहिती दिली.विद्यार्थ्यांनी अनेक

प्रश्न विचारून माहिती घेतली.या क्षेत्रभेटी चे आयोजन उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी, घनश्याम माळी,शरयू देशमुख यांनी केले होते.या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी,विजय देशमुख,प्रा. केशरसिंह बगेरिया, विनायकराव देशपांडे,भास्करराव काळे,मु.अ.ईश्वर वाघ व सुजाण पालकांनी कौतुक केले आहे.

चौकट,प्रत्यक्षात एसी तयार करताना बघून विज्ञानाची गोडी निर्माण झालीविद्यार्थी सोहम बोंदरवाल,कुलकर्णी सरांनी कारखाना आणि एसी मधील माहितीआम्हाला करून दिल्याने उद्योग क्षेत्राची माहिती झाली, असे विद्यार्थिनीअश्विनी मुळे म्हणाली.

००००००फोटो ओळी……-संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीच्याविद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीच्या माध्यमातून शहरातीलअ‍ॅप्राक्रॉप,अ‍ॅप्राकुल ए सी(वातानुकूलन) कारखान्याला भेट देऊन उद्योगक्षेत्राची प्रत्यक्षात माहिती जाणून घेतली.

संबंधित पोस्ट

पाणी व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत कार्यक्रमात प्रतिपादन- जलसाक्षरता, पाणीबचत, पुनर्वापरासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातून दिशा…

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड . निलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट…

विधानपरिषद लक्षवेधी- :राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असूनही शाळा बंद नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांचे योग्य समायोजन होणार

परिवहन सेवांसाठी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा Ø परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

संजय गांधी विभागातील आयटी असिस्टंटच्या मानधन वाढीबद्दल पालकमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद

कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व औजाराचे वितरण शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta