vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण : हिंदु जनजागृती समितीचा राज्यव्यापी राष्ट्रभक्ती जागरण सप्ताह ! राज्यात ६० हून अधिक ठिकाणी सामूहिक वंदे मातरम् गायन; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग..

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण : हिंदु जनजागृती समितीचा राज्यव्यापी राष्ट्रभक्ती जागरण सप्ताह ! राज्यात ६० हून अधिक ठिकाणी सामूहिक वंदे मातरम् गायन; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग..

राज्य प्रतिनिधी-भारत राष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान ठरलेल्या आणि कोट्यवधी भारतियांमध्ये क्रांतीची ज्वाळा चेतविणाऱ्या ‘वंदे मातरम्’ गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली. या स्मरणार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यभर विशेष राष्ट्रभक्ती जागरण उपक्रम एक सप्ताहभर आयोजित करण्यात आला. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनातून नागरिकांनी मातृभूमीप्रती अभिमान व्यक्त केला.

   या उपक्रमास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, मुंबई आदी ठिकाणी नागरिकांनी राष्ट्रध्वज आणि क्रांतीकारकांचे फलक हातात धरून “वंदे मातरम्”चा जयघोष केला. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यांतही या उपक्रमाचा विस्तार झाला.

     महाराष्ट्र राज्यातील ६० हून अधिक ठिकाणी आयोजित सामूहिक गायन कार्यक्रमात पाच हजारांहून अधिक राष्ट्रभक्त नागरिक, माजी सैनिक, शिक्षक, विद्यार्थी, तसेच विविध सामाजिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. कोल्हापूर येथे आमदार राजेश क्षीरसागर आणि अन्य मान्यवरांनी या उपक्रमाचे उद्घाटन करून देशभक्तीचा संदेश दिला.

   हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, “बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत आज १५० वर्षानंतरही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची ज्वाला चेतवत आहे. या गीताची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी आम्ही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायले जावे, असे आवाहन करीत आहोत.”श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,हिंदु जनजागृती समिती(संपर्क क्र.: ७०२०३८३२६४

संबंधित पोस्ट

खापाल कामकाजासाठी वनविभागातून सेवानिवृत्त झालेल्याइच्छुक सेवानिवृत्त लेखापालांनी अर्ज करावेत….

महसूल विभागाच्या सर्व सेवा नागरिकांना वेळेत मिळण्यासाठी महसूल यंत्रणेने काम करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी घेतला महसूल विभागातील विविध योजनांचा आढावा…

सह्याद्रीच्या कुशीत रंगलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’

पहलगाम  दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘तिरंगा रॅली’ आयोजन

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधादरम्यान झालेल्या संघर्षात ३ जणांचा मृत्यू..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजर्षि शाहू सहकारी बँकेचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta