vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम व सफाईमित्रांचा कृतज्ञ सन्मान…

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम व सफाईमित्रांचा कृतज्ञ सन्मान…

       नवी मुंबई प्रतिनिधी-   19 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्याप्रमाणे जागतिक शौचालय दिन (World Toilet Day) म्हणून साजरा करण्यात येतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या दिवसाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील सर्व 405 सार्वजनिक व सामुदायिक शौचालयामध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे शौचालयाची दैनंदिन स्वच्छता करणा-या 560 सफाईमित्रांचा कॅप आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

  अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली आयोजित या स्वच्छता आणि सन्मान उपक्रमात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे हे आकांक्षी शौचालय, कोपरखैरणे येथे स्वच्छता मोहीमेत स्वत: सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री. नरेश अंधेर व विजय पडघन तसेच सर्व विभाग कार्यालयातील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता निरीक्षक आणि अभियंता श्री. वैभव देशमुख यांनीही शौचालय स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. शौचालयाचा वापर करा (Use Toilet) असा संदेश लिहिलेला पांढ-या रंगाचा मॅस्कॉट लक्ष वेधून घेत होता.

      शौचालयाच्या वापरातून सार्वजनिक आरोग्य, मानवी प्रतिष्ठा व वैयक्तिक सुरक्षा ही उद्द‍िष्ट साध्य होत असल्याने स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण यांच्या एकत्रित विचारातून शौचालय वापराला प्राधान्य देण्यात येत आहे. याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी जागतिक शौचालय दिन (World Toilet Day) साजरा करण्यात येत असतो. नवी मुंबई महानगरपालिकेने या निमित्त शौचालय स्वच्छतेची विशेष मोहीम राबवित तेथील स्वच्छतेसाठी दैनंदिन काम करणा-या सफाई मित्रांच्या कामाचा आदर राखत कृतज्ञ सन्मान केला आहे

0000

संबंधित पोस्ट

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन येथे घेतली शपथ

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली**पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा*

vishwatmaklokswamivarta

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासिकांच्या विद्यार्थ्यांनी काढली पारंपारिक वेशात आषाढी दिंडी..

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर उसळला!

vishwatmaklokswamivarta

अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांसाठी सावळी येथे 29 जुलैला व्यवहारिक मराठी भाषा पाठ्यक्रम कार्यशाळा