vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत निपाणा ग्रामसभेत ‘कुष्ठरोग मुक्त गाव’ संकल्प…

कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत निपाणा ग्रामसभेत ‘कुष्ठरोग मुक्त गाव’ संकल्प…

बुलढाणा, प्रतिनिधी: प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव देवी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत निपाणा येथे कुष्ठरोग शोध मोहिमेच्या अनुषंगाने मंगळवार, दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामसभा उत्साहात पार पडली. सरपंच संतोष तांदुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी एकत्रितपणे ‘कुष्ठरोग मुक्त गाव’ करण्याचा संकल्प करत मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दिनांक 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय मोहिमेत निपाणा ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविल्याने गाव कुष्ठरोग मुक्तीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या प्रसंगी मोताळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता इंगळे, डॉ. प्रवीण लहाने, आरोग्य कर्मचारी श्रीमती दादेराव, ग्रामपंचायत सदस्य जोशी, ग्रामसेवक श्री सुरडकर, आशा स्वयंसेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामसभेत कुष्ठरोगाविषयी जनजागृती, घराघरात तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर उपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे निपाणा गावाने आरोग्यदायी आणि रोगमुक्त समाज निर्मितीकडे भक्कम पाऊल टाकले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

 

0000

संबंधित पोस्ट

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचे हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

एचआयव्ही जनजागृती रॅलीमध्ये अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

जागतिक हिवताप दिनी नवी मुंबईत जनजागृती शिबिरांचे आयोजन  

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराची सांगता कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta