vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागपूर बुक फेस्टिव्हल – २०२५’ अंतर्गत चार दिवसीय ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

नागपूर बुक फेस्टिव्हल – २०२५’ अंतर्गत चार दिवसीय ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

राज्य प्रतिनिधी- रेशिमबाग मैदान, नागपूर

नॅशनल बुक ट्रस्ट (#एनबीटी) इंडियाच्या वतीने व महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नागपूर बुक फेस्टिव्हल – २०२५’ अंतर्गत चार दिवसीय ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. संवेदना अभिव्यक्तीचे वरदान लाभलेल्या मनुष्याकडे अभिव्यक्तीसाठी भाषा, साहित्य, पुस्तके ही माध्यमे आहेत. अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते. प्रगल्भ सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम पुस्तकांच्या माध्यमातून होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. गोंड राजांनी सार्वजनिक ग्रंथालयाची परंपरा सुरू करून ज्ञानसंस्कृती रुजवली. भोसले काळात हिंदवी स्वराज्याच्या विस्तारात नागपूरने मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य अभिजात आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राजा बढे, राम शेवाळकर, महेश एलकुंचवार, सुरेश भट, ग्रेस, वि. भि. कोलते, ग. त्र्यं. माडखोलकर, मारुती चितमपल्ली, परशुराम खुणे यांच्यासारख्या अनेक साहित्यिकांनी या संस्कृतीला समृद्ध करण्याचे काम केले आहे. लिटरेचर फेस्टिव्हलच्या माध्यमातून नागपूरच्या सांस्कृतिक जडणघडणीत अत्यंत मोठा बदल होणार आहे. विदर्भ ही भाषेच्या संगमाची भूमी आहे. मराठी आणि हिंदी साहित्य निर्मितीची समांतर समृद्ध परंपरा येथे पहावयास मिळते. माहितीकडून ज्ञानाकडे जायचे असल्यास आणि ज्ञानी म्हणून नावलौकीक मिळवायचा असेल तर पुस्तकांशिवाय पर्याय नाही. तरुण पिढीपर्यंत पुस्तके पोहोचविण्याची गरज आहे. एनबीटी देशभरात वाचनसंस्कृती पुनर्स्थापित करण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे. या उपक्रमाचा एक भाग असलेले नागपूर पुस्तक महोत्सव नवी उंची गाठेल – मुख्यमंत्री

कार्यक्रमास राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू व साहित्य अकादमीच्या उपाध्यक्ष डॉ. कुमुद शर्मा, लेखक व शिवकथाकार विजयराव देशमुख, एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, झिरो माईल यूथ फाउंडेशनचे मार्गदर्शक सत्यनारायण नुवाल, अध्यक्ष अजय संचेती, संचालक समय बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

विचाराधीन बंद्यांना न्यायाचा मार्ग दाखवणारा विधी साहाय्य उपक्रम· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सुरु असलेला उपक्रम

रायगड जिल्ह्यात पुढील ५ दिवस उष्ण व दमट हवामानाची शक्यता🌡️

नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांबाबत आढावा…

पीक विमा उतरवला नाही म्हणूनशेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही- राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

सुप्रसिद्ध बॉलीवूड आसामी गायक झुबीन गर्गला मारल्याचा कट? मुख्यमंत्र्यांकडून CID चौकशीचे आदेश…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 187 गावांमध्ये ‘जन भागिदारी अभियान’Ø 18 ते 25 मे या कालावधीत विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन