vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दि.02 डिसेंबर रोजी आठवडा बाजार पूर्णवेळ राहणार बंद जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला बंदी आदेश

दि.02 डिसेंबर रोजी आठवडा बाजार पूर्णवेळ राहणार बंद जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला बंदी आदेश

 

रायगड- प्रतिनिधी:-जिल्ह्यातील (पोलीस अधीक्षक रायगड कार्यक्षेत्रातील) नगरपरिषद/नगरपंचायत मतदार संघात मंगळवार, दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक असल्याने मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील (पोलीस अधीक्षक रायगड कार्यक्षेत्रातील) नगरपरिषद/नगरपंचायत मतदार संघात ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) मधील तरतुदीनुसार आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याबाबतचा बंदी आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला आहे.

मा.राज्य निवडणूक आयोगाने दि.04 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशान्वये राज्यातील नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत मतदार संघामध्ये मंगळवार, दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

०००००

संबंधित पोस्ट

भगवान बाबा बालिकाश्रमास उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेआणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट       

vishwatmaklokswamivarta

प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्यात पहिले विमान घेणार “टेक ऑफ”**जगातील सर्वात जलद “बॅग क्लेम” प्रणाली होणार कार्यान्वित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रादेशाच्या एकात्मतेसाठी कटीबद्ध राहू या- इमाव कल्याण मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य द्या – मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा…