vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रम

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रम

        सांगली, प्रतिनिधी : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बुधवार, दि. 3 डिसेंबर 2025 रोजी डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल, माधवनगर रोड सांगली येथे सकाळी 8 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महेश धोत्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा परिषद, सांगली, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, सांगली व जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या शाळा व कर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

         या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व प्रवर्गाच्या एकूण ३७ दिव्यांग शाळा सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील पुतळा (साखर कारखाना परिसर) ते डेक्कन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन हॉल, माधवनगर रोड सांगली या ठिकाणापर्यंत दिव्यांग शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी यांची जनजागृतीच्या उद्देशाने रॅली आयोजित केली आहे. तद्नंतर दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक व विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

      या कार्यक्रमास जिल्ह्यातील दिव्यांग शाळा मधून जवळपास 1500 विद्यार्थी व पालक सहभागी होणार आहेत. प्रत्येक दिव्यांग शाळांनी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांना अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पोलिस भरतीमध्ये जालना येथील स्व.भूदेवी किशनराव गोरंट्याल क्रीडा प्रबोधिनी मधील विद्यार्थ्यांची निवड

आपत्ती निवारणासाठी प्रशासन अलर्ट; पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश दारव्ह्यातील दहेली येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक, आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांचा घेतला आढावा

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ हेल्पलाइन· मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध..

vishwatmaklokswamivarta

दै. मराठवाडा साथी”चे संपादक सतिश बियाणी यांचे दुःखद निधन छत्रपती संभाजीनगर येथे आज अंत्यसंस्कार

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासह ‘एसआयआर’च्या कामाला गती द्यावी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या सूचना

नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा द्या – जिल्हाधिकारी सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ