vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शिक्षण परिषदेतून शिक्षकांना मिळणार सकारात्मक शिस्तीचे धडे- मंत्री दादाजी भुसे..

शिक्षण परिषदेतून शिक्षकांना मिळणार सकारात्मक शिस्तीचे धडे- मंत्री दादाजी भुसे..

मुंबई, प्रतिनिधी:- शिस्त ही भीतीतून नाही तर विश्वासातून निर्माण झाली पाहिजे. सकारात्मक शिस्त हीच मुलांच्या उज्वल भविष्याची खरी पायाभरणी आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. या अनुषंगाने त्यांनी सकारात्मक शिस्त याविषयी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षण परिषदेचे आयोजन होणार आहे

राज्यात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेचे प्रकार समोर येत असून समाजात याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षित वातावरण आणि शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, तालुके आणि केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदांमध्ये ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर किमान 45 मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या मार्गदर्शन सत्रामध्ये विविध मुद्यांवर चर्चा केली जाणार असून त्यामध्ये शारीरिक शिक्षेबाबत शिक्षण अधिकार अधिनियमातील तरतुदी व शिक्षकांची जबाबदारी, शिक्षेचे प्रकार व स्वरूप, शिक्षेचे परिणाम, शिक्षेचा मनावर व मेंदूवर होणारा परिणाम, विविध शैक्षणिक विचारवंत व त्यांचे सकारात्मक शिस्तीचे विचार, सकारात्मक शिस्त तत्वे व त्यांची अंमलबजावणी, संवाद सहकार्य व समुपदेशन यावर आधारित वर्ग व्यवस्थापन, योग्य शिस्तीचे मार्ग, सकारात्मक शिस्तीचे तंत्र व उपक्रम आदी मुद्यांचा समावेश असेल.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विकसित केलेल्या मुख्याध्यापक मार्गदर्शिका भाग दोन मधील ‘सकारात्मक शिस्त-एक आव्हान’ या लेखाचा आधार घेण्याचे सुचविण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी- एक वृक्ष उपक्रमपर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन, सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ निमित्त शपथविधी कार्यक्रम उत्साहात“आपली सेवा, आमचे कर्तव्य” संकल्पाने पारदर्शक व वेळेत सेवा देण्याचा निर्धार

बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रात ‘नक्शा’ पथदर्शी कार्यक्रम-  आज उद्घाटन होणार

vishwatmaklokswamivarta

तेरा वर्षांचा अंधार मिटला… भाजपा नेते सतीश घाटगे यांनी दूर केला श्रीरामनगर वस्तीचा अंधार

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय

कु. श्रेयांश व कु. काशि यांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी ठाणे बाल कल्याण समिती किंवा विश्व बाल केंद्र, नेरुळ यांच्याशी संपर्क साधावा

vishwatmaklokswamivarta