vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत

महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत

राज्य प्रतिनिधी -महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत. राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांसाठी आज मतदान पार पडेल.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगासह पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. या मतदानासाठी 17 हजार 367 कंट्रोल युनिट आणि 34 हजार 734 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही बळकट करावी, असं आवाहन निवडणूक आयोग तसेच राज्य सरकारने केले आहे
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. (Nagar Parishad Nagar Panchayat Election 2025) संपूर्ण निवडणूक प्रकियेसाठी पुरेशा मतदान यंत्रांची (EVM) व्यवस्था करण्यात आली आहे असे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. त्यात एकूण 17 हजार 367 कंट्रोल युनिट; तर 34 हजार 734 बॅलेट युनिटचा समावेश आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात होईल, संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार नाही. तेथे सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे.

संबंधित पोस्ट

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत बैठक…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा १३४ वा भाग; समाज घडवणाऱ्या प्रेरणादायी प्रवासाचे दर्शन

मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या व अभिनेत्री विजया मेहता यांच्या निधन

गोंदिया जिल्ह्यातील कृषी विकासाच्या सर्व प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· इंदू मिल येथील पुतळ्यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’ : नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन