vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डाक विभागाची सांगलीत 19 डिसेंबरला पेंशन अदालत

डाक विभागाची सांगलीत 19 डिसेंबरला पेंशन अदालत

        सांगली, प्रतिनिधी : भारतीय डाक विभागाची विभागीय स्तरावरील सहामाही पेंशन अदालत दि. 19 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग यांचे कार्यालय सांगली येथे आयोजित केली आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक डाकघर सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

       जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, अशा वेतन धारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारींचे 3 महिन्यांच्या आत निवारण झालेले नसेलतर, अशा प्रकरणांचा पेंशन अदालतमध्ये विचार केला जाणार आहे. पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यासह प्रकरणे, ई वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, टी.बी.ओ.पी. / एम.ए.सी.पी पदोन्नती, वेतन श्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबीसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार करण्यात येणार नाही.

निवृत्तीवेतनधारक विहित नमुन्यातील अर्ज प्रवर अधीक्षक डाकघर सांगली विभाग यांचे कार्यालय, सांगली प्रधान डाकघर इमारत, राजवाडा चौक, सांगली -416416 यांच्या नावे दि. 15 डिसेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी वैयक्तिक रूपाने पाठवू शकतात. दि. 15 डिसेंबर 2025 नंतर प्राप्त अर्जावर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नसल्याचे प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे

संबंधित पोस्ट

राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारा हा #महसूलविभाग.

वाशिम वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘संत सेवालाल महाराज’ नामकरण

बातमी प्रसिद्धीचा राग मनात धरुन पत्रकार विष्णु कदम यास मारहाण करणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीसीएमची मागणी

vishwatmaklokswamivarta

श्री सेवागिरी प्रदर्शनात कृषि विभागाचा स्टॉल ठरतोय आकर्षण*

पुण्यातील पिंपरी-चिंचवड विभागातील दुर्दैवी घटना-दरड कोसळल्याप्रमाणे कचरा इमारतीवर आला; पिंपरीमध्ये इमारत कोसळल्यानंतर अधिकाऱ्याने सांगितला घटनाक्रम, आतमधून मदतीसाठी आवाज….

vishwatmaklokswamivarta

नवरात्रोत्सवात मुंबईकरांसाठी बेस्टची विशेष सुविधा 🚌 २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान महालक्ष्मी मंदिर मार्गांवर अतिरिक्त बसेस धावणार.

vishwatmaklokswamivarta