vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वायू व ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणा-या18 विकासकांवर बांधकाम स्थगितीची (Stop Work) कारवाई..

वायू व ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणा-या18 विकासकांवर बांधकाम स्थगितीची (Stop Work) कारवाई..

         नवी मुंबई  प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी बांधकाम व पुनर्विकासाची कामे सुरु आहेत. या कामांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टिंगच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या तक्रारींस अनुसरून मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःहून दाखल करुन घेतलेली (Suo Moto) जनहित याचिका क्र.3/2023 मध्ये मा.उच्च न्यायालयाने दि.11/12/2023 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार वायू प्रदूषण कमी करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मान्यतेने दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.

 त्या अनुषंगाने आयुक्त महोदय यांचे मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विकासक, वास्तुविशारद यांची सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्यासमवेत ध्वनी व वायू प्रदूषणास प्रतिबंध करणेकरिता जाहीर मानक कार्यप्रणालीचे पालन करणेबाबत सूचना करणेकरीता दि. 06 नोव्हेंर 2025 रोजी बैठक आयोजित केली होती.

   या बैठकीमध्ये सहायक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण यांनी सर्व विकासकांना मानक कार्यप्रणालीची सविस्तर माहिती देत त्याचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना दिल्या होत्या व ज्या विकासकांकडून सदर मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन होईल अशा विकासकांना दंड आकारण्यात येईल तसेच याबाबत गांभीर्याने कार्यवाही न झाल्यास सदर विकासकांच्या प्रकल्पांना बांधकाम स्थगिती आदेश (Stop Work) देण्यात येतील, असे स्पष्टपणे सूचित केले होते.

 सध्या हिवाळी कालावधीत वातावरणातील वाढलेले धूळ आणि धुळीचे प्रमाण लक्षात घेत त्यादृष्टीने विविध उपाययोजना करताना बांधकाम साईट्सवर प्रदूषण प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केल जात असल्याबाबत प्रत्यक्ष साईट्सला भेट देऊन तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मानक कार्यप्रणालीची प्रत्यक्ष जागेवर अंमलबजावणी योग्य रितीने होत असलेबाबतची खातरजमा करणेकरिता नगररचना विभागामार्फत अभियंत्यांची विभागनिहाय पथके तयार करण्यात आली होती. या अभियंत्यांनी बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एकूण 85 प्रकल्पांच्या ठिकाणी सदर कार्यप्रणालीचे पूर्णपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार दि.26 नोव्हेंबर 2025 रोजीच्या पत्रान्वये सदर 85 प्रकल्पांच्या विकासकांना अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करणेबाबत तसेच उक्त मानक कार्यप्रणालीतील बाबींची त्वरीत पूर्तता करुन पुढील 7 दिवसात आपला खुलासा सादर करणेबाबत सूचित करण्यात आले होते. अन्यथा त्यांच्या भूखंडावर देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीस काम स्थगिती (Stop Work) आदेश देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे कळविण्यात आले होते.    त्या अनुषंगाने एकूण 85 प्रकल्पांपैकी 18 प्रकल्पांच्या विकासकांनी मानक कार्यप्रणालीतील प्रमुख बाबींची पूर्तता न केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित प्रकल्पांना महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने बांधकाम स्थगिती (Stop Work) आदेश देण्यात आलेले आहेत. नवी मुंबईतील पर्यावरणाविषयी जागरूक राहत वायूप्रदूषण प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलली जात असून 18 बांधकामांना दिलेले स्थगिती आदेश हा त्याच उपाययोजनांचा एक भाग आहे.

Plot No. 75 & 76, Sector -15, CBD Belapur, Navi Mumbai.M/s.Mayuresh Real Estate and Management Pvt. Ltd.

2/Plot No. 01, Sector -30,31, CBD Belapur, Navi Mumbai.M/s. Today Royal Bilcon ( Mount Bliss )

3/Plot No 86A, Sector-15 ,CBD-Belapur, Navi MumbaiM/S Welvan Securities Pvt Ltd./M/S Shamirth Infra Pvt Ltd

4/CTS 1003Shabaz, Navi Mumbai M/S Gami Enterprises

5/Plot No G 41 & 42, Sector-19/20 ,CBD-Belapur, Navi Mumbai M/s Shivshaklti Co Ltd

6/Plot No 14, Sector-30 ,CBD-Belapur, Navi MumbaiM/s Sant dyaneshwar mauli sanstha

7/CTS 122A Shabaz kille gaothan, Navi Mumbai M/s Dattaguru CHS

8/CTS 122B Shabaz kille gaothan, Navi Mumbai M/s Dattaguru CHS

9CTS 100 to 107 & 1198 kille gaothan, Navi Mumbai,M/s Vinay angre

10/Plot No 22 to 26, Sector 13, Nerul M/s DDSR Dreamwood CHS

11=Plot No.55, Sector 19A, Nerul

AK Infra,

12Plot No.56, Sector 19A, Nerul M/s. Varsha Infrastructure

13-Plot No. 36,37 &38, Sector 25, Nerul M/s Platinum Developers

14-

Plot No. 11A, Sector 30, NerulM/s Saras Infra

15-Plot 11, Sector 30, NerulM/s Platinum Developers

16-Shubham CHS, Plot no 01, sect-16 vashi, Navi MumbaiM/s.Shubham CHS

17-Pachratna CHS, Plot no 15, sect-09 vashi, Navi MumbaiM/s. Akshar Developer

18-PLOT NO. 22, SECTOR 09, GhansoliM/S CITY INFRA

000000

संबंधित पोस्ट

भिवंडी येथील  २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कालावधीत वाढ..

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 61 जिल्हा परिषद गट व 13 पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत जाहीर

vishwatmaklokswamivarta

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज कल्याण पूर्व येथे #शिवसेना विजय निर्धार सभा मोठ्या उत्साहात आणि कल्याणकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात संपन्न

vishwatmaklokswamivarta

भेसळयुक्त खाद्यतेलाचा ४२ हजार २९४ किलो साठा जप्त;अन्न व औषध प्रशासन विभागाची ऑगस्टपासूनची कारवाई

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta