vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सिकलसेल, थॅलेसेमिया, हेमोफिलिया जनजागृती सप्ताह 

सिकलसेल, थॅलेसेमिया, हेमोफिलिया जनजागृती सप्ताह

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी):जिल्हा आरोग्य विभागामार्फत सिकलसेल, थॅलेसेमिया व हेमोफिलिया या अनुवंशिक रक्तविकारांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ११ ते १७ डिसेंबर २०२५ दरम्यान जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाद्वारे नागरिकांमध्ये तपासणी, निदान आणि उपचाराबाबत जागरूकता वाढविण्यावर भर दिला जात आहे.

जिल्ह्यात सध्या एकूण ५१० सिकलसेल वाहक आणि ५७ सिकलसेल ग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २२ रुग्णांना ‘हायड्रॉक्सियुरिया’ हे औषध उपचारासाठी सुरू करण्यात आले असून त्यांच्या आरोग्यात उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तसेच इतर रुग्णांना नियमित फॉलिक अॅसिड देण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्व गर्भवती महिलांची प्रसूतीदरम्यान सिकलसेल तपासणी केली जाते आणि जर त्या वाहक अथवा रुग्ण आढळल्या, तर त्यांच्या पतीचीही तपासणी करण्यात येते.

अभियानाचे उद्दिष्ट:रक्ताशी संबंधित अनुवंशिक आजारांचे लवकर निदान, तपासणीचे प्रमाण वाढविणे आणि उपचार सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख हेतू आहे.

या आठवड्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयात पुढील उपक्रम राबविले जात आहेत –

सिकलसेल, थॅलेसेमिया, हेमोफिलिया तपासणी शिबिरे.हिमोग्लोबिन चाचणी (HPLC) आणि सिकलसेल सॉल्युबिलीटी टेस्ट.आजाराची लक्षणे, प्रसार व प्रतिबंध याविषयी जनजागृतीगर्भवतींसाठी विशेष तपासणी व समुपदेशन,शाळा-महाविद्यालयांत माहितीपर व्याख्याने,रुग्ण व कुटुंबीयांसाठी समुपदेशन,विवाहपूर्व रक्त तपासणीचे महत्त्व पटवून देणारी मोहीम.

हे तिन्ही आजार अनुवंशिक असून, तपासणीमुळे त्यांचे लवकर निदान शक्य होते. दोन्ही पती-पत्नी वाहक असल्यास त्यांच्या बाळामध्ये आजाराचा धोका वाढतो. नियमित तपासणी, वेळेवर उपचार आणि समुपदेशनामुळे आजाराचे दुष्परिणाम कमी करता येतात. सरकारकडून तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

रोगांची लक्षणे थोडक्यात:

सिकलसेल: हात-पाय दुखणे, अशक्तपणा, पिवळे पडणे, वाढ खुंटणे, वारंवार आजारी पडणे.थॅलेसेमिया: जास्त अशक्तपणा, पोटाला सूज, हाडांचे बदल, वाढ खुंटणे.

हेमोफिलिया: किरकोळ जखमेवर जास्त रक्तस्राव, सांध्यात सूज, नाकातून वारंवार रक्त येणे, शस्त्रक्रियेवेळी रक्तस्राव वाढणे.लग्नापूर्वी दोघांची रक्त तपासणी करणे आणि गर्भवती स्त्रियांनी Hb Electrophoresis चाचणी वेळेत करणे अत्यंत आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले आहे. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास रुग्ण सामान्य, आरोग्यदायी जीवन जगू शकतो.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या जनजागृती आठवड्यात सक्रीय सहभाग नोंदवावा, तसेच जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन सिकलसेलची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

अद्ययावत मॉडयूलर ओ.टी. कामासाठीसिव्हील हॉस्पीटल सांगलीत नियमित शस्त्रक्रिया बंद राहणार- तातडीच्या शस्रक्रिया सुरू राहणार- नियमित शस्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे होणार

सिकलसेल मुक्तीसाठी १५ जानेवारीपासून विशेष अभियान*७ फेब्रुवारीपर्यंत तपासणी व जनजागृती*

vishwatmaklokswamivarta

जीबीएस सिंड्रोमची लक्षणे  

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ रूग्णालयातील कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये पहिल्या रूग्णावर केमोथेरपी उपचार

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मेकिंग द डिफरन्स एनजीओ आणि पीपीएफएएस म्यूचुल फंड कंपनीच्या सीएसआर फंड द्वारे मदतीचा हात,वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्यासाठी उपयोगी अशा विविध ९७ वस्तूंची मदत…

vishwatmaklokswamivarta

महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी ‘संजीवनी अभियान’