vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महापारेषण’ला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाची तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान

महापारेषण’ला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाची तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान..

डेहराडून , प्रतिनिधी : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण उत्तराखंड विधानसभेच्या अध्यक्ष रितू खंडुरी भूषण व माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर, सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) व भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला. महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले.

उत्तराखंडमधील डेहराडूनच्या हॉटेल एमरॉल्डमध्ये आयोजिलेल्या ४७ व्या भारतीय जनसंपर्क परिषदेच्या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी `पीआरएसआय`चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, सचिव डॉ. पीएलके मूर्ती, गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप गुप्ता, पद्मश्री डॉ. बी. व्ही. के. संजय यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

जनसंपर्क विभागाचे काम कौतुकास्पद : डॉ. संजीव कुमार,महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी यशाचे श्रेय जनसंपर्क विभाग व त्यांच्या टीमवर्कला दिले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तब्बल १४ राष्ट्रीय पुरस्कार व एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा महापारेषणचा जनसंपर्क विभाग अव्वल ठरला आहे. सृजनशील व नावीन्यपूर्ण काम व मीडियात सातत्याने होणारे नवे बदल समजून जनसंपर्क विभागाने कामांमध्ये वैविध्यता आणून सकारात्मक बदल केले.

 

0000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

vishwatmaklokswamivarta

शहीद बाळकृष्ण निकम यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सांत्वन शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.28 एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

नवी मुंबई महानगरपालिकला सीआयटीआय टेक्सटाईल सस्टेनेबिलिटी राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान…

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’चे पुणे येथे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात”सेवा पंधरवाडा” सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविणार – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta