vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सीआयआयच्या ‘आंतरराष्ट्रीय शिखर परिषदे’मध्ये राज्याच्या प्रगतीचा आढावा

सीआयआयच्या ‘आंतरराष्ट्रीय शिखर परिषदे’मध्ये राज्याच्या प्रगतीचा आढावा…

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन असून, राज्याने परकीय थेट गुंतवणूक, वित्तीय सेवा, फिनटेक, उत्पादन, पायाभूत सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर्स, स्वच्छ ऊर्जा यांसारख्या नव्या क्षेत्रांत आघाडी घेतली आहे. काही राज्ये सवलतींमुळे गुंतवणूक आकर्षित करतात, महाराष्ट्र विश्वासामुळे गुंतवणूक खेचतो आहे. असा आढावा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) यांच्या वतीने आयोजित मुंबई आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत महाराष्ट्राच्या औद्योगिक, गुंतवणूक आणि डिजिटल प्रगतीचा आढावा मांडण्यात आला. या परिषदेला शासन, उद्योग, व्यापार आदि क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मान्यवर उपस्थित होते.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, CII मुंबई आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे अध्यक्ष वैभव वोहरा, ब्रिटिश उप उच्चायुक्त हरजिंदर सिंग कांग, ब्राझील वाणिज्यदूतावासाचे महावाणिज्यदूत जोसे माउरो दा फोन्सेका कोस्टा काउतो, CII वेस्टर्न रिजनचे अध्यक्ष ऋषी कुमार बागला, CII वेस्टर्न रिजनचे उपाध्यक्ष वीर अडवाणी, CII चे सह-अध्यक्ष अनुराग अगरवाल आदी उपस्थित होते. परिषदेला विविध क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रतिनीधी उपस्थित होते.आर्थिक, पायाभूत, डिजिटल तसेच विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या अफाट संधीबाबत यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

 

0000

संबंधित पोस्ट

बोगस कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई – अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.

vishwatmaklokswamivarta

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यांची धारावी विभागातून सभासद नोंदणी अभियान…

कोल्हापूर कागल तालुक्यातील सिद्धिविनायक सोसायटी कुटुंब मेळा संपन्न

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक_*मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

सिडको वाळूज ग्रोथ सेंटर जमीन संपादनासाठी टीडीआर व सर्वसमावेशक आरक्षणाचा पर्याय – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन मनोहर जोशी (मरणोत्तर), पंकज उधास (मरणोत्तर) आणि शेखर कपूर यांना ‘पद्मभूषण’ मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त

vishwatmaklokswamivarta