vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्मार्ट’अंगणवाडीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

‘स्मार्ट’अंगणवाडीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यातील अंगणवाडी स्मार्ट करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करावा,असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले

महिला बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी घेतला. प्रधानमंत्री मातृवंदना योजना, अंगणवाडी विकास, बाल भिक्षेकरी निर्मूलन, बाल मृत्यू प्रतिबंधक अभियान, कुपोषण मुक्ती अभियान, बालविवाह रोखणे अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मंगला पांचाळ, बाल विकास अधिकारी गणेश पुंगळे, तालुका बालविकास अधिकारी मनिषा कदम, जी.आर. अंधारे, संतोष जाधव, श्रीमती कल्पना देशमुख तसेच सर्व तालुका बालविकास अदिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षक आदी दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील लाभार्थी गरोदर महिलांची नोंदणी, त्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी याबाबत माहिती देण्यात आली.जिल्ह्यातील अंगणवाडी ह्या स्मार्ट करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न व्हावेत. त्यात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असावा. सर्व शासकीय विभागांनी समायोजनातून हा उपक्रम राबवावा. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

आरक्षण सुविधेने प्रवास सुखकर होईल: भास्करराव दानवे

vishwatmaklokswamivarta

नेपाळ-तिबेट पूर आपत्ती : महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४X७ समन्वय,बेपत्ता नागरिकांच्या शोध व ओळखीसाठी केंद्र व राज्य यंत्रणांशी सातत्याने समन्वय…

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनो, घरच्या बियाण्याचे संरक्षण करा; कृषि विभागाचे आवाहन

सिडको वाळूज ग्रोथ सेंटर जमीन संपादनासाठी टीडीआर व सर्वसमावेशक आरक्षणाचा पर्याय – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

जिल्हा सेवा सेवाप्रवेशोत्तर परीक्षा २०२४ साठी आवेदन पत्रे जिल्हा परिषदेकडून प्राप्त करा !आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी       

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम : शेख महेमूद