vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

मुंबई, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते.बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मित्राचे सल्लागार परशराम पाटील यांच्यासह जेएसडब्ल्यू ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी लागणारी सर्व मदत विभाग करेल असे सांगून मंत्री राणे म्हणाले की, कोकणातील उत्पादने लवकरात लवकर आणि सहज निर्यात होण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. बंदराला जोडणी होण्यासाठी कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गतीने हाती घेण्यात येत आहे. उत्पादन तपासणी प्रयोगशाळा १५ जानेवारीपर्यंत सुरू करावी. यंदाच्या हंगामात काजू जयगड बंदरातून निर्यात होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी तयारी करावी. उत्पादकांमध्ये जागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

 

०००

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी यांची कुलभैय्या अनाथालयास भेट देवून पाहणी …

गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाचे दीपक रणवरे यांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले असून भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले यावेळी निवासी जिल्हाधिकारी श्री रामदास दौंड पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासन दरबारी मान्य चे लेखी आश्वासन दिले,जालन्यात ब्राह्मण समाजाचे दीपक रणनवरे यांचे आमरण उपोषण मागे *भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीला यश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक

vishwatmaklokswamivarta

.म्हाडा लोगो गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश – मंत्री शंभूराज देसाई

राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा

संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत हेल्लेनिक प्रजासत्ताकाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत केली द्विपक्षीय चर्चा

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बिहार, पूर्व राजस्थान, गुजरात, लक्षद्विप, ओडिशा आणि सिक्कीम मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta