vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

नववर्षानिमित्त मद्यविक्री कालावधीत शिथिलता…

नववर्षानिमित्त मद्यविक्री कालावधीत शिथिलता…

लातूर, प्रतिनिधी : नववर्षानिमित्त राज्यातील एफएल-२, एफएल-३, सीएल-३, एफएलबीआर-२ व एफएल-४ व नमुना ई अनुज्ञप्त्यांच्या आस्थापना निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी उघड्या ठेवण्यास राज्य शासनाने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम १३९ (१) (सी) व कलम १४३(२)(एच१)(iv) अन्वये मंजुरी दिली आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान (एफएल-२) आणि बंद बाटलीतून बिअर विक्री (एफएलबीआर-२) आस्थापना सुरु ठेवण्यास ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. परवाना कक्ष (एफएल-३) आणि क्लब अनुज्ञप्ती (एफएल-४) यांच्या कालावधीत ३१ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस आयुक्तालयाच्या परीक्षेत्रासाठी रात्री १.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत आणि पोलीस आयुक्तालय परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रासाठी रात्री ११.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. तसेच सीएल-३ अनुज्ञप्तीसाठी महापालिका तसेच ‘अ’ व ‘ब’ नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तीसाठी रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री १० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

देशातील सर्व दलितांनी एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा मायावती यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये मोबाइल मेडिकल युनिट्सद्वारे मोफत आरोग्य सेवा सुरू सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत दोन लाख नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्यसेवा…

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट