vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून माध्यम नियंत्रण कक्षाची व निवडणूक तक्रार निवारण कक्षाची पाहणी …

मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून माध्यम नियंत्रण कक्षाची व निवडणूक तक्रार निवारण कक्षाची पाहणी …

नवी मुंबई प्रतिनिधी प्रतिनिधी   नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 चे कामकाज निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विषयक प्रत्येक बाबीसाठी विभागप्रमुख श्रेणीच्या अधिकाऱ्यांकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

          त्याचप्रमाणे निवडणूकीची प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने पार पडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत मुख्‍य निवडणूक निरीक्षक म्हणून महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भाऊसाहेब दांगडे तसेच निवडणूक निरीक्षक म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धनंजय सावळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

          या निवडणूक निरीक्षकांमार्फत विशेष बैठकीत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा बाबनिहाय आढावा घेण्यात आला असून निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. निवडणूक विषयक कामकाजाच्या आढाव्याप्रमाणेच त्यांच्यामार्फत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाला भेटी देत प्रत्यक्ष पाहणी करुन तेथील कामकाजाचेही निरीक्षण करण्यात आलेले आहे.

          राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मुख्य निवडणूक निरीक्षकांमार्फत सूचित करण्यात आल्याप्रमाणे नागरिकांना निवडणूकीविषयी तक्रार / सूचना करण्यासाठी नमुंमपा मुख्यालय स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. त्यास अनुसरून नागरिक 1800222309 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अथवा nmmcelectionobserver@gmail.com या ई – मेल आयडीवर आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत व निवडणूक विषयक इतर बाबींबाबत तक्रार / सूचना करु शकतात. त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालयात निवडणूक विभागामध्येही लेखी स्वरुपात तक्रार / सूचना दाखल करु शकतात. मुख्य निवडणूक निरीक्षकांनी आयुक्तांसमवेत मुख्यालयातील तक्रार निवारण कक्षाची पाहणी करुन तेथील रेकॉर्डची तपासणी केली व दाखल सूचना / तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीच्या नोंदी घेण्याच्या सूचना केल्या.

          या पाहणीमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षकांनी मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावर स्थापित केलेल्या प्रसारमाध्यम निरीक्षण कक्षाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली तसेच वर्तमानपत्रात प्रसिध्द होणाऱ्या बातम्यांचेही निरीक्षण केले. माध्यम निरीक्षण कक्षामध्ये उपग्रह वाहिन्या तसेच केबल वाहिन्यांवरून प्रसारित होणा-या बातम्यांचे निरीक्षण करण्यासाठी दूरदर्शन संच बसविलेले असून त्यासाठी नियुक्त कर्मचा-यांमार्फत वृत्तचित्रवाहिन्यांचे निरीक्षण करून नवी मुंबई महापालिका निवडणूक संबंधित बातम्यांची नोंद घेतली जात आहे. त्याचप्रमाणे समाज माध्यमांवरील मजकूराचेही निरीक्षण केले जात आहे. तसेच दररोजच्या वर्तमानपत्रातील निवडणूक विषयक बातम्यांचे अवलोकन करून त्याची कात्रणे संकलित केली जात आहेत.

 निवडणूकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर राजकीय पक्ष / उमेदवार यांच्याकडून प्रचारासाठी प्रसिध्द केल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या मसुदयास महानगरपालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची प्रसिध्दी करण्यापूर्वी मान्यता घेणे आवश्यक असून त्याकडे विशेष लक्ष देण्याचे मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून सूचित करण्यात आले तसेच पेडन्यूज विषयक बाबींकडेही बारकाईने लक्ष देण्यात यावे असे निर्देशित करण्यात आले

0000

संबंधित पोस्ट

पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी मुसंडी! भाजप २०० पार…

किनगाव राजाची लखन-दुर्गा ठरली रांजणी केसरीचे मानकरी*बैलजोडी मालाकला सतीश घाटगेकडून मिळाली दुचाकी भेट

vishwatmaklokswamivarta

लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे डॉ. मुळे यांना भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन केंद्र उपयुक्त ठरेल- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अग्निशमन केंद्र, कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

बालआनंद उत्सव-२०२५ सादरीकरणातून शिकाल जीवन जगण्याची कला- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta