vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राकाँपा जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस–मनसे युतीच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा; ठिकठिकाणी पुष्पहारांनी स्वागत..

राकाँपा जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेस–मनसे युतीच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा; ठिकठिकाणी पुष्पहारांनी स्वागत..

 

जालना (प्रतिनिधी) : जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे युतीकडून प्रभाग क्रमांक ३ मध्ये प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शकुंतला नगर, मंठा रोड परिसरात भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी पुष्पहार घालून चव्हाण यांच्यासह युतीच्या उमेदवारांचे जंगी स्वागत केले.

या पदयात्रेत प्रभाग क्रमांक ३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस–मनसे युतीचे अधिकृत उमेदवार ड) जमिला बेगम मोहम्मद खैराती, अ) ललित सुभाष कुचेकर, क) वैष्णवी विजय जाधव यांच्यासह पुरस्कृत उमेदवार साबळे सुनिता सहभागी होत्या.प्रचारादरम्यान प्रभागातील नागरिकांनी जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांना युतीच्या सर्व उमेदवारांना भक्कम पाठिंबा देत विजयाची खात्री दिली. विकास, पारदर्शकता आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर युतीच्या उमेदवारांना संधी देण्याची भावना मतदारांमध्ये स्पष्टपणे दिसून आली.

या प्रचार पदयात्रेत जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद,युवक सरचिटणीस धैर्यशील चव्हाण, मिर्झा अन्वर बेग, समीर खैराती, सतीश डेंगळे, जावेद अली, सिताराम तुपे, शेख शफीक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमअन्वये कार्यशाळा उत्साहात

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली पोलीस दल – प्रोजेक्ट उडान चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणार्थींचा निरोप समारंभ संपन्न..

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीतील काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. थोड्याच वेळात त्यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी करण्यात येणार आहे.

vishwatmaklokswamivarta

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

जिल्ह्यात ‘डिजिटल जनगणने’ ची तयारी सुरू६४ फिल्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाने मोहीम सुरू

vishwatmaklokswamivarta