vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप-निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार

क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप-निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार

आरोग्य प्रतिनिधी-क्षयरोगमुक्त जिल्ह्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महानगर गॅस लिमिटेडने मुंबई यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून (CSR) 550 क्षयरुग्णांना 3 हजार 300 पोषक आहार फूड बास्केटचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते जिल्हा परिषद, अलिबाग येथे करण्यात आले.

जिल्हाधिकारी किशन जावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्याना निक्षय मित्र बनवून त्यांना फूड बास्केट वाटप देण्यासाठीचे अहवान केले होते त्यास प्रतिसाद देत महानगर गॅस लिमिटेड मुंबईने ही कार्यवाही केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले की, क्षयरोगमुक्त रायगड जिल्हा घडवण्यासाठी केवळ शासनाचेच नव्हे तर कॉर्पोरेट क्षेत्राचेही योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अधिकाधिक कंपन्यांनी ‘निक्षय मित्र’ बनून क्षयरुग्णांच्या उपचार व पोषणासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

पोषणयुक्त आहारामुळे क्षयरोगाच्या रुग्णांना उपचारादरम्यान आवश्यक ऊर्जा व प्रतिकारशक्ती मिळते, ज्यामुळे रोगमुक्तीची प्रक्रिया अधिक प्रभावी ठरते. महानगर गॅस लिमिटेडने या उपक्रमातून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवत रुग्णांच्या आरोग्य संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

या कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.प्राची नेहूलकर, महानगर गॅस लिमिटेडचे सहाय्यक उपाध्यक्ष (मानव संसाधन) संकेत धोत्रे, मुख्य व्यवस्थापक (CSR) सुसंता कुमार राउत, सहाय्यक व्यवस्थापक (CSR) कु. प्रियांका दळवी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर

वैद्यकीय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीत नवे बदल आवश्यक पल्स 2026 मधील चर्चासत्रात भर

जालन्यात 16 फेब्रुवारी रोजी रोजी मोफत मधुमेह निदान उपचार व मार्गदर्शन शिबीर

vishwatmaklokswamivarta

शालेय विद्यार्थ्यांना उत्तम आहार, उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन चांगलं खा;चांगलं व्हा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राज्यात आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार २३९९ उपचार कॅशलेस; रुग्णालयांवर कडक नियंत्रण

vishwatmaklokswamivarta

मलेरीया / डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांचा सहभाग घेण्याकरीता जाहीर शिबीरांचे आयोजन*