vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. जनकल्याणाच्या विविध योजना राबवितांना जनगणनेमुळे प्राप्त माहितीचा वापर केला जातो. अशा या जनगणनेचे काम हे कर्तव्य भावनेने करावे व आपला सक्रीय सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना केले

जनगणना 2027 अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनगणना कर्मचाऱ्यांचे घरयादी गणना करुन गट तयार करण्याबाबत प्रशिक्षण पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालय, विविध शासकीय कार्यालये, नगरपालिका, तहसिल कार्यालये येथील कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.

निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य संगिता राठोड, प्रशिक्षण देण्यासाठी आलेले जनगणना संचालनालयाचे सहा.संचालक प्रवीण भगत, जनगणना निरीक्षक अरुण साळगावकर, तज्ज्ञ व्यक्ती रामदास मंडाले आदी उपस्थित होते.

दोन टप्प्यात होणार जनगणना,

 जनगणना 2027 ही दोन टप्प्यात होत आहे. त्याती पहिला टप्पा घराची यादी तयार करुन त्याचे गट तयार करणे हा असून हा टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत पार पाडला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष जनगणना फेब्रुवारी 2027 मध्ये सुरु होईल. यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही जनगणना ही संपूर्ण डिजीटल असेल. त्यात स्वगणनेचे म्हणजेच स्वतः नागरिकांना आपली माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ओळखक्रमांक (आयडी) तयार होणार आहे. अर्थात ही भरलेली माहिती स्वतः जनगणना कर्मचारी येऊन पडताळणी ही करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील श्रीमती उर्मिला धारुरकर यांनी सूत्रसंचालन केले.

०००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे ४ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी. डी. एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर येलदरी धरणातून पाणीपुरवठ्याबाबत आढावा बैठक

भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी माहे ही पाणबुडीविरोधी युद्धनौका सज्ज

vishwatmaklokswamivarta

आज संसद भवन परिसरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते . राहुल गांधी, काँग्रेस नेत्या . प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते  अखिलेश यादव यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने..

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग,  शेतमजूर,, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू,अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक*दिवसातून दोनवेळा करणार आरोग्य तपासणी…