vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची ‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान”

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची

‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान”

    अमरावती, प्रतिनिधी: राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अमरावती डाक विभागातर्फे ‘नन्ही मुस्कान, बडी उडान’ विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

     या मोहिमेत 10 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी ‘सुकन्या समृद्धी खाते’ उघडण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील डाक अधिकारी, कर्मचारी शाळा, अंगणवाडी तसेच घरोघरी जाऊन मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनजागृती करीत आहेत. मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी सुकन्या समृद्धी खाते हा एक महत्त्वाचा उपक्रम असून पालकांनी मुलीचे खाते उघडून त्यांच्या भविष्यासाठी भरीव पाऊल उचलावे, असे आवाहन प्रवर अधिक्षक डाकघर यांनी केले आहे.

     या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मुलींचे शिक्षण व आर्थिक सक्षमीकरणासाठी जागरूकता निर्माण करण्याचा डाक विभागाचा मानस आहे. तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या ध्येयाला बल देणाऱ्या या योजनेचा लाभ घ्यावा, मुलींच्या स्वप्नांना पंख द्यावेत, असे आवाहन डाकघरचे प्रवर अधीक्षक पी. ए. गेडाम यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशांनुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेत ‘नो मॅपिंग’ किंवा ‘लॉजिकल डिस्क्रेपन्सी’ असलेल्या आणि सुनावणीसाठी नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही- मुख्य निवडणूक अधिकारी

vishwatmaklokswamivarta

दिलेला शब्द पाळला… 👏🏻शिवकन्याताईंनी शिक्षणासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल! 📚🎉

महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांसाठी सैन्य अग्निवीर भरती मेळावा, दिनांक 20 जुलै, 2026 पासून मुंब्रा, ठाणे येथे सुरू होणार आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये #नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली, ३८ कोटींची तडजोड

जालना शहरात पाम सण्डे निमित्त प्रभात फेरी उत्साहात संपन्न

नमुंमपा मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडीत करण्याची धडक कारवाई