vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कराटे प्रशिक्षणामुळे मुलींना सुरक्षिततेचा नवा आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे- सांगलीच्या लेकी झाल्या ‘फायटर’! 38 हजार विद्यार्थिनी घेत आहेत स्वसंरक्षणाचे धडे

कराटे प्रशिक्षणामुळे मुलींना सुरक्षिततेचा नवा आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे- सांगलीच्या लेकी झाल्या ‘फायटर’! 38 हजार विद्यार्थिनी घेत आहेत स्वसंरक्षणाचे धडे

        सांगली प्रतिनिधी: आत्मसंरक्षण हे केवळ शारीरिक कौशल्य नसून ते स्वावलंबन, निर्भयता आणि आत्मविश्वास घडवणारे माध्यम आहे. ‘सांगली पॅटर्न – कन्या सबळीकरण अभियान’ अंतर्गत मुलींना देण्यात येणाऱ्या कराटे प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये दिसणारा उत्साह खरोखरच प्रेरणादायी आहे,” असे गौरवपूर्ण प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

    जिल्हा प्रशासनाचा माध्यमिक शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यातील 50 माध्यमिक शाळांमध्ये हे विशेष अभियान राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल 38 हजार विद्यार्थिनींना कराटेचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज सांगलीतील कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशालेस भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

मैदानावर दिसली ध्येयाची चमक     शाळेच्या आवारात कराटेचे पंचेस आणि किक्सचा सराव करणाऱ्या मुलींना पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “सराव करताना मुलींच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि डोळ्यांत ध्येयाची चमक आहे, ती पाहून माझ्यातही नवी ऊर्जा संचारली. त्यांच्या मनोगतातून सकारात्मकता आणि जिद्द स्पष्टपणे जाणवते

एका विद्यार्थिनीच्या अनुभवाने उपक्रमाचे यश अधोरेखित   यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी एका पाचवीतील विद्यार्थिनीचा आवर्जून उल्लेख केला. ही मुलगी पूर्वी तिच्या आईसोबत शाळेत येत असे; मात्र कराटे प्रशिक्षण सुरू झाल्यापासून तिचा आत्मविश्वास इतका वाढला आहे की, आता ती एकटीच निर्धास्तपणे शाळेत येते. हा बदल म्हणजेच ‘कन्या सबळीकरण अभियाना’चे खरे यश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

    प्रास्ताविकात माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी ‘सांगली पॅटर्न’च्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी प्रभारी उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) गिता शेंडगे, कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशाला मुख्याध्यापिका उमा संभूस, उपमुख्याध्यापक सुभाष सावंत, पर्यवेक्षक दिलीप संकपाळ, कराटे प्रशिक्षक सचिन ढोले आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

00000

संबंधित पोस्ट

आज अहमदाबादमधील अपघातस्थळी प्रधानमंत्री यांनी भेट दिली.दृश्य हृदयद्रावक होते.बचाव व मदत कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व टीमची भेट घेतली.ही दुर्घटना अकल्पनीय आहे.ज्यांनी आपले प्रियजन गमावले,त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आज शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मतदान…

vishwatmaklokswamivarta

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार -पालकमंत्री जयकुमार रावल

होय,आपण क्षयरोग संपवू शकतो-पनवेल मनपाचा निर्धार ;टी.बी.मुक्त भारत अभियान अंतर्गत 100 दिवसीय मोहिमेची दमदार सुरुवात

मुंबईकरांसाठी खुशखबर – दिवाळीत म्हाडाच्या घरांची विक्री – प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज सुरू

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन