vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात 117 उपाययोजनांचा समावेश

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात 117 उपाययोजनांचा समावेश

अकोला, प्रतिनिधी-: यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी 217 उपाययोजनांचा समावेश असलेल्या 3 कोटी 87 लक्ष रू. च्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मान्यता दिली.

सदर प्रस्ताव जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आराखड्यात 188 गावांचा समावेश आहे. अकोला तालुक्यातील 16, बार्शिटाकळीतील 49, बाळापूरमधील 11, पातूरमधील 50, मूर्तिजापूरमधील 24, अकोटमधील 18 व तेल्हारा तालुक्यातील 20 गावांचा समावेश आहे.

उपाययोजनांत विहिर अधिग्रहणाची 129, विहीर खोलीकरणाची 9, नळयोजना विशेष दुरूस्तीची 11, विंधनविहीरींची 45 व कूपनलिकांची 23 कामे प्रस्तावित आहेत. त्यानुसार कामांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

०००

संबंधित पोस्ट

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त होणार सामुहिक गायन …

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर महानगरपालिकेमार्फत सखोल स्वच्छता मोहीमा

स्वच्छ जल,स्वच्छ मन’ मोहीमेंतर्गत नवी मुंबईत जलाशय व परिसर स्वच्छतेच्या ठिकठिकाणी विशेष मोहीमा

vishwatmaklokswamivarta

विमाशि संघाचे मंगळवारी विदर्भस्तरीय धरणे आंदोलनशिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन..

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज…