vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान…

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; प्रस्ताव मागविले

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभुत सोई-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत असून इच्छुक संस्थांकडून अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
अनुदान प्राप्त करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील इच्छुक बौद्ध संस्थांनी अल्पसंख्याक विकास विभाग यांचे दि.२७ जानेवारीच्या शासन परिपत्रकात नमूद तरतूदीनुसार विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दि.२० फेब्रुवारी पर्यंत सादर करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. या योजनेंतर्गत पायाभूत सोयी सुविधेसाठी अनुदान मर्यादा २ लाखावरून वाढवून १० लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
०००००

संबंधित पोस्ट

सातारा जिल्हयातील अनुकंपा उमेदवारांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर रोजी नियुक्ती आदेश वितरण*

भारतीय हवाई दलाने तांत्रिक शाखेत अधिकारी संवर्गात पात्र व्यक्तींचा समावेशासाठी नवी योजना जाहीर

नागरिकांनी उष्माघातापासून काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन

रेशीम उत्पादनाच्या ‘जालनाई ब्रँड ‘चा जालन्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभसिल्क, सीड आणि स्टीलची सिटी म्हणून आता जालना जिल्हा ओळखला जाणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जालन्यातील रेशीम बाजारपेठेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शानदार उदघाटन

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात अवैध कारवायांविरोधात धडक मोहीम-आरटीओ, उत्पादन शुल्क, महसूल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई; 10.96लाखांचा दंड, अवैध दारूसह ट्रॅक्टर जप्त

vishwatmaklokswamivarta