vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार· ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता…

राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार· ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता…

राज्य प्रतिनिधी -राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे राज्यात आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

राज्यातील बांधकाम सुरू असलेले जलसिंचन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज वित्तीय संस्थाकडून घेण्याचा निर्णय सात ऑगस्ट २०१९ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यापैकी ७५०० कोटी रुपयांच्या प्रथम टप्प्यातील कर्ज नाबार्डकडून घेण्याचा निर्णय ११ मार्च २०२४ रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आता उर्वरित ७५०० कोटी रुपयांचे कर्ज नाबार्डकडून घेण्यास मान्यता देण्यात आली. यानुसार राज्यातील ५७ अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे आणि १९३ पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास एकत्रित सुधारित मान्यता देण्यात आली. सर्व जलसिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यात सुमारे आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

पंधरा हजार कोटी पैकी ८ हजार ९८२ कोटी ७६ लाख रुपये ५७ अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तर ६ हजार १७ कोटी २४ लाख रुपये १९३ पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांच्या कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठीच्या कामासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

–00—00000

संबंधित पोस्ट

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या 12 वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान,लोकमान्य टिळकांचे विचार आजही राष्ट्राला दिशा देणारे; अजित डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,अजित डोवाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरिकांना उष्मालाटेपासून बचावासाठी दक्षता घेण्याचे आवाहन

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महा रक्तदान अभियानाचे आयोजन..