vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली शेगाव येथील तयारीची पाहणी.

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली शेगाव येथील तयारीची पाहणी

बुलढाणा प्रतिनिधी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव येथे विविध ठिकाणांना भेटी देऊन महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीची सविस्तर पाहणी केली. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने येत्या २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६’ चे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्याला राष्ट्रपती महोदयांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यांनी कार्यक्रम स्थळ, सुरक्षा व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींचा बारकाईने आढावा घेतला.

भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री श्री. जाधव यांनी राष्ट्रपतींच्या आगमनासाठी तयार करण्यात येत असलेले हेलिपॅड, कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आणि मुख्य सोहळ्याच्या ठिकाणची पाहणी केली. राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यासाठी येणाऱ्या रुग्ण आणि नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था, विविध पॅथींचे स्टॉल्स, औषध वितरण केंद्र आणि रुग्ण तपासणीसाठी उभारण्यात येत असलेल्या विशेष स्टॉल्सच्या तयारीचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. आरोग्य मेळाव्यात येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही आणि तपासणी प्रक्रिया सुलभ राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित विभागांना दिल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी केंद्रीय मंत्र्यांसमवेत आमदार संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या तयारीवर श्री. जाधव यांनी समाधान व्यक्त केले असून, राष्ट्रपतींचा हा दौरा आणि राष्ट्रीय आरोग्य मेळावा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 

00000

संबंधित पोस्ट

15 ते 18 मे कालावधीत जिल्ह्यात यलो अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

रक्षामंत्र्यांनी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या मानद दर्जाचे सन्मान चिन्ह केले प्रदान लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा हे चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय भावनेचे प्रतीक: राजनाथ सिंह

vishwatmaklokswamivarta

संत एकनाथ महाराज पालखी सोहळा:-वारकऱ्यांसाठी सर्व विभागाकडून सुविधांची सज्जता- अपर जिल्हाधिकारी डॉ.संभाजी अडकूणे

भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत प्रेक्षकांना देशातील व देशाबाहेरील दर्जेदार नाटकांचा अनुभव घेता येणार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र आणि गोव्यासाठी ‘ राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थे’च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 सार्वजनिक परीक्षांचे वेळापत्रक संस्थेकडून जाहीर

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’

vishwatmaklokswamivarta