vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

तृतीयपंथीय उमेदवारांसाठी गुरूवारी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

तृतीयपंथीय उमेदवारांसाठी गुरूवारी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

 

सांगली, प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने जिल्ह्यातील तृतीयपंथीय उमेदवारांसाठी दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली येथे होणार आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

या मेळाव्याचा मुख्य उद्देश तृतीयपंथीय उमेदवारांना शासनाच्या विविध रोजगार, स्वयंरोजगार व कर्ज योजनांची सविस्तर माहिती देणे, त्यांना उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन करणे व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा आहे. उपस्थित उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीच्या क्षेत्रानुसार वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाणार असून, विविध विभागांच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात येणार आहे. या मार्गदर्शन मेळाव्यामुळे तृतीयपंथीय उमेदवारांना स्वावलंबनाच्या दिशेने ठोस पाऊल उचलण्यास निश्चित प्रेरणा मिळणार आहे.

या मेळाव्यात उद्योजक बनण्यासाठी शासनाच्या योजना या विषयावर जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, विविध कर्ज योजना व अर्थसहाय्य या विषयावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या समन्वयक अनुजा पाटील तर रोजगाराच्या विविध संधी व नोंदणी प्रक्रिया या विषयावर सहायक आयुक्त इनुजा शेख मार्गदर्शन करणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सामूहिक तेलबिया पीक प्रात्यक्षिकांतर्गत शेतकरी प्रशिक्षण व शेती शाळा संपन्न नागापूर येथे सोयाबीन व्यवस्थापनावर मार्गदर्शन; प्रक्षेत्र भेटीतून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन

आरावी व श्रीवर्धन बीच विकासकामांचा-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

अमरावतीत 19 मे रोजी रोजगार मेळावा;महिंद्र ॲन्ड महिंद्र’ कंपनीत हजार जागांवर प्रधानमंत्री इंटर्नशिपची संधी

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

ड्रोन प्रणालीचे उड्डाण व मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील-नियंत्रण कक्षाचे आज दि.09 जानेवारी रोजी होणार उद्घाटन

विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा…