vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

DJP कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

DJP कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

 

जालना, प्रतिनिधी : युवकांमध्ये क्रीडासंस्कार रुजविण्यासाठी व ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माय भारत, जालना व धरती जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा DJP कॅम्पस, रोहनवाडी रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

स्पर्धेचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर तसेच DJP कॅम्पसचे प्रशासकीय अधिकारी श्री. अश्रूबा घाडगे व भागवत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे (मुले व मुली), गोळाफेक (मुले व मुली) आणि खो-खो (मुले व मुली) या विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाप्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली.

विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी, पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा. पुरुषोत्तम राखुंडे, मुकेश चव्हाण, विजय जऱ्हाड, डॉ. विठ्ठल कुचके, डॉ. मीनल ठोसर, डॉ. कृष्णकुमार सिंग, ऋषिकेश दिवटे, प्रीती कालुसे, अविनाश चव्हण, जयपाल राठोड आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा  –जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

पिंपरी येथील पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्रात (पीओपीएसके) पारपत्र मोबाईल व्हॅन सेवा 20 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत उपलब्ध

तलाठी निवडीच्या बनावट आदेशांना बळी पडू नका;जिल्हा प्रशासनाचे आवाहन

तासगाव तालुक्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथील सत्र क्रमांक 10 मधील 476 प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अंमलदारांचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न

आज सोमवार जिल्हा ग्रंथोत्सव याचा शुभारंभ; परिसंवाद, कवीसंमेलन कार्यक्रमांची रेलचेल

vishwatmaklokswamivarta