vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक-2026 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक-2026 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक

        सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ व्दैवार्षिक निवडणूक-2026 च्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियात प्रसारित करण्यात येणाऱ्या प्रचाराच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी कळविले आहे. उमेदवारांनी सदर जाहिराती प्रमाणित करूनच प्रसारित कराव्यात. तसेच, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनीही जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबीची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.

   टीव्ही, केबल नेटवर्क/ केबल चॅनेल्स, सिनेमा हॉल्स, आकाशवाणी, रेडिओ, एफएम वाहिन्या, सार्वजनिक ठिकाणी दाखवण्यात येणाऱ्या ऑडिओ व्हिज्युअल्स जाहिराती, ई न्यूजपेपरवरील जाहिराती, बल्क एसएमएस किंवा व्हॉईस मेसेजेस, सोशल मीडियावरील जाहिराती, इंटरनेट वेबसाईटवरील जाहिरातींचे प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. विविध माध्यमांवर निवडणूक प्रचाराचे संनियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजयनगर, सांगली येथे जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जाहिरातीच्या प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज व अन्य अनुषंगिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर सांगली येथे संपर्क साधावा.

 

00000

संबंधित पोस्ट

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून जालना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली 

vishwatmaklokswamivarta

सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका; चाईल्ड हेल्प लाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहीम

एमआयडीसीतील निष्क्रिय भूखंड काढून घेणार – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत उद्योगस्नेही धोरण व दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटिबद्ध