vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

व्यावसायिक प्रतिनिधी-अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळं सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरु होती. आज सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. 5 मार्चला 24 कॅरेट सोन्याचे दर 2698 रुपयांनी कमी होऊन 159850 रुपयांवर आले आहेत. तर, सराफा बाजारात सोने उच्चांकाच्या तुलनेत 16271 रुपये स्वस्त आहे. सोन्याचा दर 176121 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जीएसटीसह सोन्याचा दर 164645 रुपये आहे.

आयबीजेएनं जारी केलेल्या दरांनुसार 22 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर 150815 रुपये तोळा आहे. तर, 18 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर 123484 रुपये आहे. आयबीजेएकडून दिवसातून दोन वेळा सोन्यचा दर जाहीर केला जातो.

आयबीजेएनं दरात घसरण झाल्याचं सांगितलं असलं तरी प्रत्यक्ष सराफा बाजारात बुलियन्स को ईनच्या अपडेटनुसार नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 240 रुपयांची वाढ होऊन 161770 रुपये दर झाला आहे. मुंबईत 230 रुपयांची वाढ होऊन सोनं  162040 रुपये, कोलकाता येथे 230 रुपयांची वाढ होऊन सोनं 161830 रुपये, चेन्नईत 240 रुपयांची वाढ होऊन सोनं 162520 रुपये तर लखनौ मध्ये सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ होऊन 162100  रुपये प्रति 10 ग्रॅम दर आहे.

चांदीच्या दरात घसरण-सोन्याच्या दरातील घसरणीप्रमाणं चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. आयबीजेएनं जारी केलेल्या दरांनुसार चांदीचे दर 13547 रुपयांनी कमी झाले आहेत.जीएसटीशिवाय चांदीचा दर 257800 रुपये किलो आहे. तर, जीएसटीसह चांदीचा एक किलोचा दर 2.65 लाख इतका आहे. 29 जानेवारी 2026 ला सराफा बाजारात चांदीचा दर 385933 रुपयांवर पोहोचला होता, त्या तुलनेत सध्या चांदी 128133 रुपये स्वस्त आहे.

चांदीचेनवी दिल्ली, मुंबईतील दर,बुलियन्स को ईन च्या दरानुसार दिल्लीतील चांदीचा दर 264190 रुपये किलो आहे. मुंबईत 264650 रुपये, कोलकाता येथे 264300 रुपये, पाटणा येथे 264510 रुपये, जयपूरमध्ये 264610 रुपये तर लखनऊमध्ये चांदीचा दर 265290 रुपये आहे

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरांवर होत असतो. सोने आणि चांदीचे दर गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्या सुरु असलेल्या अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धामुळं देखील सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरु होती. गेल्या वर्षभरात चांदीचा औद्योगिक क्षेत्रातील वापर वाढल्यानं चांदीचे दर वाढले आहेत. जागतिक आर्थिक अनिश्चितता, भूराजनैतिक तणाव या काळात गुंतवणूकदार सर्वसाधारणपणे भांडवली बाजारातील गुंतवणूक कमी करतात. भांडवली बाजारातील गुंतवणुकीऐवजी सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जातं. परिणामी सोन्याचे दर वाढल्याचं दिसून येतं.

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करावेत

महाराष्ट्रात उद्योगांना चालना देण्यासाठी ‘मैत्री’ कायदा !एकल खिडकी योजनेमुळे उद्योजकांना परवानग्या मिळणार जलदगतीने

इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती;अर्ज मागविण्यात आले

कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक व्हा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- एनएसएसच्या विद्यार्थ्यांना कृषि उद्योग दूतचे प्रशिक्षण 

vishwatmaklokswamivarta

निर्यातवाढीसाठी तालुकास्तरीय मेळावे घ्यावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा निर्यात प्रचालन समितीची बैठक संपन्न- ज्येष्ठ कृषि तज्ज्ञ नानासाहेब पाटील यांनीही केले मोलाचे मार्गदर्शन- निर्यात वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta