vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

नवी मुंबईत ९ मार्चपासून ‘ढोलकीफड तमाशा महोत्सव’

नवी मुंबईत ९ मार्चपासून ‘ढोलकीफड तमाशा महोत्सव’

मुंबई, प्रतिनिधी: सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून ९ मार्च ते १३ मार्च, २०२६ या कालावधीत ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम ९ मार्च ते १३ मार्च, २०२६ या कालावधीत सायंकाळी ६.३० वा. सिडको सेक्टर ५, गांवदेवी मैदान, सानपाडा, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे. ९ मार्च,२०२६ रोजी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मु.पो.नाराणगांव, जि.पुणे; १० मार्च, २०२६ रोजी संगीताची राणी कमल अनिल कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मु.पो.आगाशिवनगर, दांगटवस्ती, ता.कराड, जि.सातारा; ११ मार्च, २०२६ रोजी वगसम्राट मा.शांताराम चव्हाण दहिवतकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मु.पो.दहिवत, ता.अमळनेर, जि.जळगांव; १२ मार्च,२०२६ रोजी तमाशा महर्षी आनंदराव महाजन लोकनाट्य तमाशा मंडळ, आसोदा रोड, शनिपेठ, जळगाव; १३ मार्च,२०२६ रोजी तमाशा सम्राट तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मु.पो.नारायणगांव, जि.पुणे यांचे सादरीकरण होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ढोलकीफड तमाशा महोत्सव पार पडणार आहे. हा महोत्सव रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, नवी मुंबई परिसरातील रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

एशियन कल्चर’ पुरस्काराने दिग्दर्शिका सई परांजपे सन्मानित*आपली संस्कृती या महोत्सवांदरम्यान पहायला मिळते : दिग्दर्शिका सई परांजपे*

vishwatmaklokswamivarta

वेव्हज मध्ये भारताला सर्जनशील आशय सामग्रीमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची संधी गवसेल” अभिनेते अल्लू अर्जुन यांनी व्यक्त केला विश्वास…

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित  ‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ‘राजा शिवाजी’सिनेमाचं वादळ, मोडले कमाईचे रेकॉर्ड्स!

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

दा. कृ. सोमण यांचा निसर्ग संवर्धनाचा संदेश ‘वन्यजीव-निसर्ग-साहस’ व्याख्यानमाला रंगली

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी  झालेआई-बाबा…