vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम;किशोरवयीन मुलींना एचपीव्ही (HPV) मोफत लस जिल्ह्यातील २१ हजार मुलींना होणार लाभ

जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम;किशोरवयीन मुलींना एचपीव्ही (HPV) मोफत लस जिल्ह्यातील २१ हजार मुलींना होणार लाभ

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-जिल्हा प्रशासनामार्फत किशोरवयीन मुलींना एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) प्रतिबंधक लस मोफत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २१,१९५ मुलींना ही लस दिली जाणार असून जागतिक महिला दिन अर्थात दि,८ पासून हे अभियान सुरु होणार आहे. पालकांनी आपल्या मुलींना ही लस द्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांनी केले आहे.

     महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तन कर्करोगानंतर गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तज्ज्ञांच्या मते, एचपीव्ही संसर्ग हा या कर्करोगाचे प्रमुख कारण असून महिलांमधील गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरणाद्वारे हा धोका ९० ते ९९ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. त्यासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या व १५ वा वाढदिवस साजरा न केलेल्या मुलींना ही लस दिली जाते.

मोहिमेची व्याप्ती,

जिल्ह्यातील सुमारे २१,१९५ पात्र मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार आहे. तालुकानिहाय पात्र मुलींची संख्या याप्रमाणे-

छत्रपती संभाजीनगर-४५५७,गंगापूर-२६२७,कन्नड-३०४२,खुलताबाद-९५८,पैठण-३०९०, फुलंब्री-१२८०,सिल्लोड-३०२६,सोयगाव-८२४,वैजापूर-१७९१

लसीकरणाचे महत्त्व,एचपीव्ही लस ९०% हून अधिक प्रभावी आहे. एचपीव्ही प्रकार १६ व १८ पासून संरक्षण देते. २००६ पासून जगभरात ५० कोटींहून अधिक डोस सुरक्षितपणे देण्यात आले आहेत. खाजगी बाजारात किंमत ३,००० ते ५,००० रुपये; शासनामार्फत पूर्णपणे मोफत उपलब्ध.

लसीकरण कुठे व कसे? जिल्हाभरात ८ मार्चपासून मोहीम सुरू होणार. सर्व शासकीय आरोग्य संस्था, आयुष्मान भारत अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये येथे लसीकरण दिले जाणार.

नोंदणी: केंद्र शासनाच्या ‘U-WIN’ (यू-विन) डिजिटल पोर्टलवर.चिन्हांकन: लसीकरण झालेल्या मुलींच्या डाव्या हाताच्या बोटावर मार्किंग.पालक संमती: लसीकरण पूर्णतः ऐच्छिक असून पालकांच्या लेखी संमतीनंतरच दिले जाईल.समन्वय: शालेय शिक्षण विभाग व महिला बालविकास विभागाच्या सहकार्याने मोहीम राबविण्यात येणार आहे.ही मोहीम पुढील तीन महिने विशेष स्वरूपात राबवून नंतर नियमित लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येईल.

प्रशासनाचे आवाहन

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे यांनी पालकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे.

००००००

 

संबंधित पोस्ट

महिलांच्या आरोग्याच्या दिशेने बुलढाण्यात महत्वाचे पाऊल-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील* एचपीव्ही लसीकरण मोहीम लवकरच सुरू   * 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लस

vishwatmaklokswamivarta

राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन #सार्वजनिकआरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रमसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि #युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन..

vishwatmaklokswamivarta

एच.आय.व्ही. बाधित रूग्णांनी नियमितपणे ए.आर.टी. औषधोपचार घ्यावा – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील

vishwatmaklokswamivarta

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

जिल्हा आयुष रुग्णालयात वृक्षारोपण उत्साहातऔषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड ; वृक्षसंवर्धनाचा संदेश..

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुलढाण्यात ‘नेत्रदान-जीवनदान’ जनजागृती मोहीम