vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल

जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

धुळे प्रतिनिधी, महिलांमधील गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या जिल्ह्यातील प्रत्येक मुलीने एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे आज सायंकाळी जिल्हास्तरीय ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री श्री. रावल बोलत होते. या कार्यक्रमास उद्योगपती सरकारसाहेब रावल, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन खंडेराय, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल पाटील, अधीक्षक डॉ. भरत कुलकर्णी, डॉ. संजय मोरे, गट विकास अधिकारी रमेश नेतनराव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रुचिता पवार आदी उपस्थित होते.पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी या मोहिमेची राष्ट्रीयस्तरावर सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक राज्याने आपल्या क्षेत्रात एचपीव्ही लसीकरण प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार राज्य शासनानेही ही मोहीम स्वीकारत जागतिक महिला दिनानिमित्त तिची सुरुवात केली असून साधारणतः 90 दिवस ही मोहीम चालणार आहे.

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

कौशल्य विकास विभागाच्या कार्यालयांमध्ये कंत्राटी पदे भरणार;सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया 26 ऑक्टोबरपर्यंत सुरू

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील खासदारांची टि.बी.मुक्त संकल्प सभा संपन्न…!केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभियानाला गती देण्यासाठी केले लोकप्रतिनीधींना आवाहन… ! !

vishwatmaklokswamivarta

जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम

नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक करावा, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक मान्यवरांचे पत्रकार परिषदेत आवाहन 

vishwatmaklokswamivarta