vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकस्थानिक बातम्या

गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली विलेपार्ले येथे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ कार्यक्रम

गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली-विलेपार्ले येथे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ कार्यक्रम

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या लावणी परंपरेला नवे आयाम देणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्यावतीने “सोळावं वरीस धोक्याचं – अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव” हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टी आणि लोकसंगीताच्या क्षेत्रात सुलोचना चव्हाण यांनी आपल्या दमदार आवाजातून लावणीला वेगळे स्थान मिळवून दिले. “सोळावं वरीस धोक्याचं”सारख्या अजरामर लावण्यांमुळे त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गायकीतून लावणीच्या परंपरेला नवी ओळख मिळाली आणि मराठी सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध झाला. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित हा स्वरोत्सव मराठी लोकसंगीताच्या परंपरेचा गौरव करणारा ठरणार आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका संपदा माने आणि संज्योती जगदाळे या सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली अर्पण करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन निवेदक परेश दाभोळकर करणार असून संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे असणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

या स्वरोत्सवासाठी विनामूल्य प्रवेशिका ११ मार्चपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहावर उपलब्ध आहेत. मुंबई व परिसरातील नागरिक, संगीतप्रेमी आणि लावणी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अजरामर लावण्यांच्या स्वरोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

शिक्षकांनी सर्वोत्तम आदर्श आचरण ठेवावे-विभागीय आयुक्त डॉ. श्‍वेता सिंघल

vishwatmaklokswamivarta

वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा प्रकल्पास राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात राज्यस्तरीय व्दितीय पारितोषिक पर्यावरणाची काळजी घेणारा ‘बदलाचे धागे अर्थात थ्रेड्स ऑफ चेंज’ उपक्रम सर्व शहरांसाठी अनुकरणीय..

ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन“एल्डर लाईन 14567” हि टोल फ्री हेल्पलाईन

पोटखराबा क्षेत्र लागवडीयोग्य होणार; आजपासून 10 एप्रिलपर्यंत जिल्हा प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम जाहिर

vishwatmaklokswamivarta

येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या प्रदर्शन सोहळा,कलाकारांची भव्य एंट्री आणि प्रेक्षकांचा कडकडाट

vishwatmaklokswamivarta

उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील 42 कामांना प्रशासकीय मान्यता;9 बांधकामे पूर्ण

vishwatmaklokswamivarta