vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळात नोंदणीचे आवाहन

65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळात नोंदणीचे आवाहन

 

जालना, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या वतीने 65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून, पात्र चालकांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन नोंदणी करावी. ही नोंदणी मोबाईलद्वारे घरबसल्या किंवा कोणत्याही सायबर कॅफेमधून करता येणार आहे. अर्ज भरताना काही अडचण आल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे

या योजनसाठी चालक हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा. तसेच त्याच्याकडे किमान पाच वर्षांपूर्वीचा परवाना असणे आवश्यक आहे. रिक्षा किंवा मीटर टॅक्सी चालवत असताना त्याच्याकडे कोणतेही चारचाकी वाहन नसावे, अशी अटही ठेवण्यात आली आहे.

या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालकांना सामाजिक सुरक्षा व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. 65 वर्षांवरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाणार असून, चालकांसाठी विमा व आरोग्य योजनाही राबविण्यात येणार आहेत.

तसेच चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार असून, कर्तव्यावर असताना चालकास दुखापत झाल्यास कल्याणकारी मंडळामार्फत आर्थिक सहाय्यही करण्यात येणार आहे. पात्र चालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जालना सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (SIR) मोहिमेंतर्गत माहिती घेण्यासाठी घरोघरी येणाऱ्या शासकीय प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

*पीककर्ज वितरणात सातारा जिल्हा राज्यात तिसरा* *जिल्हाधिकारी संतोष पाटील* खरिप हंगामासाठी शंभर टक्के पीक कर्ज वितरण करा

वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाआषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न

पंतप्रधानांच्या हस्ते मिझोराम रेल्वे मार्गाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार ४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी; ८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta