vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता व फिरत्या पथकांचा पहारा

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता व फिरत्या पथकांचा पहारा

 सांगली, प्रतिनिधी : घरगुती एलपीजी गॅसचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी नियुक्त जिल्हा स्तरावरील दक्षता व फिरते पथकांनी तपासणीचा वेग वाढवला असून, आज सांगली, मिरज, उरूण ईश्वरपूर, जतसह अनेक ठिकाणी गॅस एजन्सीची तपासणी केली. ही माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, जिल्ह्यात एलपीजी सिलिंडर वितरण आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सींची नियमित तपासणी करण्यात येत आहे. तसेच तक्रार आल्यास संबंधित एजन्सींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणतीही अफवा किंवा गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

 सध्या जिल्ह्यात पुरेसा एलपीजी साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा 1713 मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा 94.9 मेट्रिक टन आणि आयओसीएल कंपनीचा ५८ मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून आणखी 1195.6 मेट्रिक टन एलपीजी साठा जिल्ह्यात येण्यास मार्गस्थ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडर वितरित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

मुंबईत धारावी विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सूर्यकांत परशुराम भालेकर भावी नगरसेवकाच्या यादीत असलेली चर्चा विभागात सुरू

vishwatmaklokswamivarta

महामार्गावरील  अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत,महामार्ग सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करून पंधरवड्याला अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश

आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनआपत्ती कक्ष व हेल्पलाइन कार्यान्वित शासन, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा..

श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटनयेणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित; प्रशासन सज्ज,चोख बंदोबस्त,अफवांवर विश्वास ठेवू नका-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन