vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

            सांगली, प्रतिनिधी : जिल्हा स्थलसीमा हद्दीत कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दि. 17 मार्च 2026 ते 30 मार्च 2026 अखेर पर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

  या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

          हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 17 मार्च 2026 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 30 मार्च 2026 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

भास्कर आबा दानवेंच्या पुढाकाराने भाविकांच्या तीर्थयात्रेसाठी दोन बस उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मिती – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न मार्गी लावू; ‘दादांचा वादा’प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यवतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन..

vishwatmaklokswamivarta

स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर,निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज- अपर जिल्हाधिकारी अडकुणे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी- मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta