vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस

ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस

 

​शिर्डी, प्रतिनिधी – जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वडगावपान येथील ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळल्याशिवाय पोलीस प्रशासन स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने वेळेवर घेतलेल्या काळजीमुळे विद्यार्थिनीच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाली आहे. तिच्यावरील सर्व वैद्यकीय उपचार रुग्णालयामार्फत केले जात असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला योग्य आहारही दिला जात असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थिनीच्या आईची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

उपचाराचा सर्व खर्च रुग्णालय करत असल्याने कोणतीही चिंता करू नये व तपासाबाबत काही माहिती द्यायची असल्यास ती पोलीस प्रशासनाला द्यावी, असे ते म्हणाले. पोलीस त्यांच्या पद्धतीने योग्य तपास करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीवेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रवरा वैद्यकीय प्रतिष्ठानचे विश्वस्त ध्रुव विखे पाटील, वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होहोते.0000

0

संबंधित पोस्ट

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला गौरव केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण

पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आळंदी येथे पेटसिटी युनिटचे लोकार्पण

वसतिगृह प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय; ३० वर्षांवरील पात्र विद्यार्थ्यांनाही ‘स्वयम’ योजनेच्या धर्तीवर मिळणार सहकार्य आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक चर्चा; शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

गडचिरोलीच्या मनोरंजन क्षेत्रात नवा अध्याय – वातानुकूलित सिनेमागृहाचे उद्घाटन-राज्यात नगरपालिका क्षेत्रातील पहिले मॉडेल सिनेमा थिएटर गडचिरोलीत सुरू

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज बिनविरोध निवड झाली.