vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

.म्हाडा लोगो गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश – मंत्री शंभूराज देसाई

म्हाडा लोगो गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश – मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, प्रतिनिधी : म्हाडाच्या लोगोच्या गैरवापरप्रकरणी संबंधित विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष यांना देण्यात येतील असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.याबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अनिल परब, प्रविण दरेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, म्हाडाच्या नाव व बोधचिन्हाचा वापर केवळ विशिष्ट दोन प्रकल्पांच्या जाहिरातीपुरताच सशर्त परवानगीने करण्यात आला होता. मात्र, त्याव्यतिरिक्त इतर प्रकल्पांमध्येही लोगोचा वापर झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर म्हाडाकडून संबंधित विकासकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सद्यःस्थितीत इतर कोणत्याही प्रकल्पात म्हाडाच्या लोगोचा वापर होत नसल्याचे संबंधित विकासकांनी लेखी कळविले असून, तसे म्हाडा प्राधिकरणानेही स्पष्ट केले आहे. अनधिकृत लोगो वापर झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात चौकशीअंती जे निष्कर्ष समोर येतील, त्यानुसार संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल.

0000

संबंधित पोस्ट

ग्रामविकास भवनातून ग्रामीण प्रशासनाला मिळणार नवी दिशा – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास भवनाच्या विविध सुविधांची पाहणी

बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलींचे दहावीपर्यंत प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यास विशेष मान्यता

वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका बारा वर्षाच्या बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय तीन आरोपी अटक .

ठाणे जिल्ह्यातील खाडीपात्रातील वाळू उपसा थांबला-जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर पुरस्कारप्राप्त कलाकरांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर – राज्यपाल आचार्य देवव्रत मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन