vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामीण भागात हुंडामुक्तीचा विचार रूजवण्यात अंगणवाडी सेविकांचे योगदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे-हुंडामुक्ती अभियानांतर्गत 39 अंगणवाडी सेविकांचा सत्कार

ग्रामीण भागात हुंडामुक्तीचा विचार रूजवण्यात अंगणवाडी सेविकांचे योगदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे-हुंडामुक्ती अभियानांतर्गत 39 अंगणवाडी सेविकांचा सत्कार

सांगली, प्रतिनिधी : समाजपरिवर्तन केवळ उक्तीतून नव्हे तर कृतीतून होते. अंगणवाडी सेविकांनी हुंडामुक्तीचा विचार ग्रामीण भागात रूजवण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

महिला व बालविकास विभागाच्या हुंडामुक्ती अभियानाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत ग्राम स्तरावर योगदान देणाऱ्या 39 अंगणवाडी सेविकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) सोमनाथ रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, ॲड. जयंत नवले, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, अनिष्ट प्रथा दूर करण्याच्या अनुषंगाने समाजात वैचारिक परिवर्तन घडविण्यात येणारी आव्हाने, त्याची कारणे यांचे विश्लेषण अंगणवाडी सेविकांनी करावे. त्यासाठी याबाबतचे आलेले अनुभवलेखन करावे. अंगणवाडी सेविकांनी स्वतःच्या कुटुंबामध्येही हुंडामुक्त अभियानाची अंमलबजावणी करावी, तसेच, हुंडामुक्ती अभियानाच्या पुढील टप्प्यात लग्नाचा खर्च दोन्ही पक्षांनी अर्धा अर्धा करावा, यासाठी जनजागृती करावी. यासाठी ग्रामसभेत प्रसार करावा. लग्नाच्या खर्चाची ठेवपावती करण्याबाबत प्रबोधन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हुंडा घ्यायचा नाही व हुंडा द्यायचा नाही हा विचार समाजात रुजवण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न हुंडामुक्त अभियान टप्पा – 1 राबवण्यात आला. याअंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांच्या मार्फत हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ अन्वये हुंडा प्रथेच्या विरोधात ग्रामस्तरावर प्रबोधन करण्यात आले. त्याचबरोबर प्रकल्पनिहाय सर्व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत हुंडा न घेता विवाह केलेल्या जोडप्यांची माहिती संकलन व लग्नावेळी लग्नातील दोन्ही पालकांकडून हुंडा न घेतल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले. सांगली जिल्ह्यातून लग्नात हुंडा न घेतल्याबाबतची एकूण 1169 प्रतिज्ञापत्रे प्राप्त झाली. यामध्ये सर्वात जास्त प्रतिज्ञापत्रे सादर केलेल्या एकूण 39 अंगणवाडी सेविकांचा प्रशस्तिपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविकांनी हुंडामुक्ती अभियान राबवताना आलेले अनुभव कथन करत मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी महिला व बालविकास विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हुंडा प्रतिबंध अधिनियमाच्या घडीपत्रिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- जिल्हाधिकारी अशोक काकडे

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा– राज्यमंत्री माधुरी मिसाळ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

दिवाळी पहाट’ कार्यक्रम दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

vishwatmaklokswamivarta

सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पित भावनेनेकार्य करून जीवनात यशस्वी व्हा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन-सिम्बायोसिस विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ

जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन पशुपालकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.. जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनात १६० पशुपक्ष्यांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन