vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाबाबतचे प्रश्न सोडविणार – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाबाबतचे प्रश्न सोडविणार – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

मुंबई, प्रतिनिधी : गोसीखुर्द हा प्रकल्प मोठा असल्याने त्यासंदर्भातील पुनर्वसन, मोबदला आणि अनुदान या सर्व बाबी शासनाच्या विचाराधीन आहेत याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न सोडविणार असल्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य नरेश भोंडेकर यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले गोसीखुर्द प्रकल्पासाठी भू संपादनाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर काही निर्णय बदलण्यात आले. मात्र, अद्याप काही गावांमध्ये अतिपूरामुळे धरणाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून स्थानिकांकडून तक्रारी येत आहेत. पुनर्वसन एकदाच करायचे की टप्प्याटप्प्याने करायचे, याबाबत शासन योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पुनर्वसनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबतही धोरणात्मक निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना २.९९ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. सध्याच्या प्रकल्पग्रस्तांनाही त्याचप्रमाणे अनुदान द्यायचे का, तसेच वाढीव गावांच्या पुनर्वसनाची जबाबदारी जलसंपदा विभागामार्फत घ्यायची की स्वतंत्र शासकीय निर्णयाद्वारे करायची, याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. या सर्व मुद्द्यांवर सन्माननीय सदस्यांसोबत बैठक घेऊन पुढील एक महिन्यात ठोस निर्णय घेण्यात येईल, असेही राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य संजय मेश्राम यांनी सहभाग

संबंधित पोस्ट

दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यास सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्य स्पर्धे’चे थाटात उद्घाटन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज पासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन

शेतकऱ्यांनो, ई-नाम प्रणालीव्दारे शेतमालाची विक्री करा 30 हजार शेतकऱ्यांची नोंदणी· 35 लाख क्विंटल शेतमालाच्या विक्री1300 कोटी रुपयांची उलाढाल…

vishwatmaklokswamivarta

रखरखत्या उन्हाळ्यात हिरवाईने नटलेले शुभ वर्तमान-अरण्यम प्रकल्प;कातपूर येथे ४.२५ हेक्टरवर १ लाख २७ हजार रोपांची घनवन लागवड..

राज्य शासनाची भूमिका -. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात बैठक