vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

शेगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

बुलढाणा प्रतिनिधी: राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शेगाव तालुक्यांतील पाच ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये येऊलखेड, चिंचखेड, सगोडा, टाकळी व धारवला मुरा असे पाच रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू असून निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शेगाव तहसिलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

 निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे : निवडणूकीची अधिसूचना सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दि. 7 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजूपासून छाननी संपेपर्यंत. दि. 17 एप्रिल 2026 रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. या निवडणूकीचे मतदान मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आ

संबंधित पोस्ट

नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच

नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण-नगराध्यक्षासाठी २३ तर नगरसेवकसाठी ३३९ उमेदवारांचा निकाल होणार स्पष्ट..

vishwatmaklokswamivarta

महाराजस्व समाधान शिबिरात विविध शासकीय दाखल्यांचे वाटप; मांगरुळ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा; शेतकरी व मच्छिमारांसाठी नवी दिशा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा विकास थांबणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

रेल्वे पुलाचे बांधकामामुळे चांगेफळ ते जलंब खामगांव राज्यमार्ग बंद-पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन