vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या गॅस वितरकांना सूचना• अवैध विक्री किंवा जादा दर आकारल्यास कारवाईचा इशारा

घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या गॅस वितरकांना सूचना• अवैध विक्री किंवा जादा दर आकारल्यास कारवाईचा इशारा

 

लातूर, प्रतिनिधी : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. गॅस वितरणाबाबत पारदर्शकता राखावी आणि कोणत्याही परिस्थितीत अवैध विक्री होणार नाही यावर नियंत्रण ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.

लातूर जिल्ह्यातील गॅस सिलिंडर वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीधारक आणि सेल्स ऑफिसर्सची बैठक झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गरजू आणि पत्र ग्राहकांनाच गॅसचा पुरवठा व्हावा, यासाठी एका गॅस कनेक्शनधारकाला २५ दिवसांच्या आत दुसरे सिलिंडर देण्यात येऊ नये. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना १०० टक्के घरपोच डिलिव्हरी देण्यात यावी. वितरकांनी ‘फिफो’ आणि ओटीपी प्रणालीचा वापर करून घरपोच सेवा देणे अनिवार्य आहे. ग्राहकांना एजन्सी किंवा गोदामावर बोलावू नये. तेल कंपन्यांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम ग्राहकांकडून आकारू नये. गॅस एजन्सी ठरलेल्या वेळेतच सुरू व बंद ठेवाव्यात, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. गॅस सिलिंडरचे चुकीच्या पद्धतीने वितरण किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास, संबंधित वितरकावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.

गॅस सिलिंडरची दैनंदिन मागणी आणि पुरवठा यांची माहिती जिल्हा प्रशासनास दररोज कळवणे बंधनकारक राहील. तसेच तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना पूर्ण सहकार्य करून रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

नागरिकांनी गॅस टंचाईबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. घाबरून जाऊन सिलिंडरची अनावश्यक साठवणूक करू नका. प्रशासनाकडून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.

संबंधित पोस्ट

महापारेषणची सहाय्यक अभियंता (स्थापत्य) परीक्षा शांततेत व सुरळीत राज्यातील १११ केंद्रांवर १५ हजारांहून अधिक उमेदवारांची उपस्थिती

परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण संपन्न; 32 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप…

vishwatmaklokswamivarta

युवा पिढीला एआय बेस तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‘अमरावती युवा महोत्सव 2026’चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटनमेळघाट महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना संधी..

हिंद दि चादर”अंतर्गत नरसी नामदेव येथे आज वारकरी संमेलन;* पूर्वतयारीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

कर्जमुक्तीचे १७५ कोटी ७८ लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त २३ हजार ५०८ शेतक-यांचा समावेश

बा.. विठ्ठला भरपूर पाऊस पडू दे.. व आवर्षणाचे संकट दूर कर..! माजीनगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे विठूरायाला साकडे