vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

        सांगली, प्रतिनिधी) : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील माविमच्या महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २८ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत कच्छी जैन समाज सभागृह, राम मंदिर कॉर्नर, सांगली येथे होणार आहे. सांगली शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन महिला बचत गटांच्या वस्तूंची खरेदी करावी आणि महिलांचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळ सांगलीचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

    या प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, कलाकुसरीच्या वस्तू, डाळी, कडधान्ये, सेंद्रिय फळे व भाजीपाला यांचा समावेश असणार आहे. या उपक्रमामागील उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे.

       या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे पाटील, नाबार्ड सांगलीचे उपमहाव्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ उपस्थित राहणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या बँक खात्यावर592 कोटी 34 लाखाची मदत डीबीटीद्वारे वर्ग बुलढाणा जिल्ह्यातील 674 लाभार्थींच्या खात्यात 1 कोटींची रक्कम जमा पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

साधना सप्ताहाच्या’ माध्यमातून शासकीय कर्मचारी होणार ‘फ्युचर रेडी’**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे यंत्रणेला निर्देश**कोकण विभाग सज्ज: 02 ते 08 एप्रिल दरम्यान राबविले जाणार विशेष अभियान*

रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

शेती उत्पादन वाढ, शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- कृषि विभागाच्या शेतकरी परिसंवादात प्रतिपादन- शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे आवाहन

भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास सादरीकरण बैठक

vishwatmaklokswamivarta