vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावर परिसंवाद; कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग-संगीताच्या माध्यमातून साधना करण्यासाठी मार्गदर्शन करणारे गोव्यातील प्रस्तावित विश्वविद्यालय लवकर व्हावे ! – पू. पं. केशव गिंडे*

*‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावर परिसंवाद; कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग-संगीताच्या माध्यमातून साधना करण्यासाठी मार्गदर्शन करणारे गोव्यातील प्रस्तावित विश्वविद्यालय लवकर व्हावे ! – पू. पं. केशव गिंडे*

राज्य प्रतिनिधी- *रामनाथी* – सर्व कलाकारांनी येथे येऊन केलेल्या चर्चेतून परमानंद अनुभवता आला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘संगीतातून साधना’ ही दिलेली दिशा अगदी योग्य आहे. त्यांच्या संकल्पनेतील संगीताच्या माध्यमातून साधना करण्यासाठी मार्गदर्शन करणारे प्रस्तावित विश्वविद्यालय हे लवकरात लवकर व्हावे, अशी प्रार्थना पुणे येथील ज्येष्ठ बासरीवादक पू. पं. केशव गिंडे यांनी भगवंताच्या चरणी चरणी करत आपले मनोगत व्यक्त केले. ते फोंडा, गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावरील दोन दिवसीय आध्यात्मिक परिसंवादात बोलत होते.

 २२ आणि २३ मार्च या दोन दिवसांत झालेल्या या परिसंवादात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मांडलेला ‘कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून ती ईश्वरप्राप्तीचे प्रभावी माध्यम आहे’ हा मूलभूत विचार या परिसंवादामध्ये केंद्रस्थानी होता. ‘कलेतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या दृष्टीने भावी पिढीला दिशा देणे आणि त्या अनुषंगाने प्रत्यक्ष कृतीशील उपाय शोधणे, हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश होता. या परिसंवादात पुणे, मुंबई, ठाणे आणि गोवा येथील अनेक तज्ञ आणि प्रथितयश कलाकार सहभागी झाले होते. या परिसंवादामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘संगीताच्या माध्यमातून साधनेविषयी दिलेली दिशा’ याचे सविस्तर विवेचन विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री तेजल पात्रीकर आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी केले. या विवेचनामध्ये भारतीय संगीतावर विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनकार्याची माहिती, तसेच संगीतातील सूक्ष्म अंगांचे विश्लेषण करण्यात आले. या ‍वेळी मुंबई येथील ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. विश्वनाथ कान्हेरे म्हणाले की, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयामुळे अनेक वर्षांनी असे सगळे कलाकार एकत्र आले. कलेची अंतिम पायरी ही ‘अध्यात्म’च आहे. मुंबई येथील नृत्यांगना व नृत्यगुरु, सोनिया परचुरे म्हणाल्या की, संगीताला अध्यात्माची जोड दिल्यास त्याचा परिणाम संपूर्ण भारतावर होऊ शकतो. पुढील पिढीला कलेतून अध्यात्म शिकण्यासाठी ही भूमी अत्यंत सुपिक आहे. ठाणे येथील शास्त्रीय गायक पं. निषाद बाक्रे या वेळी म्हणाले की, कलेला आध्यात्मिक दृष्टीकोन देणारी चळवळ येथून सुरू होईल. सात्त्विक कलाकार निर्माण झाल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. मुंबई येथील शास्त्रीय गायक पं. चंद्रशेखर वझे या ‍वेळी म्हणाले की, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय भविष्यात मार्गदर्शक विद्यापीठ ठरेल. आध्यात्मिक साधनेमुळे व्यक्तीबरोबर कलेचीही उन्नती होते, हे येथे प्रकर्षाने जाणवले. ठाणे येथील नृत्यांगना व नृत्यगुरु सौ. ज्योती शिधये या ‍वेळी म्हणाल्या की, या परिसंवादात केवळ चर्चा न होता आम्ही सर्वजण कृतीशील झालो. गुढीपाडव्याच्या पवित्र काळात झालेला हा उपक्रम म्हणजे संगीत साधनेच्या व्यापक कार्याची ‘गुढी’ उभारल्यासारखाच आहे. या परिसंवादाचा समारोप पू. पं. केशव गिंडे यांनी ‘पांचजन्य वेणू’ या बासरीवर भजन सादर करून झाला.*कु. तेजल पात्रीकर* ,महर्षि विश्वविद्यालय. संपर्क : ८७९३६७८१७८

संबंधित पोस्ट

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक

चार्टर्ड अकाऊंटंट (लेखा परिक्षक) नेमणूकीकरिता इच्छुक खाजगी चार्टर्ड अकाऊंटंट (लेखा परिक्षक) यांनी अर्ज करावेत

ज्यातील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सरसावलेआ. मुनगंटीवार यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा; सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

रिपब्लिकन पक्षाच्या केरळ प्रदेश अध्यक्षपदी नुसरत जहा यांची नियृक्ती – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली अधिकृत घोषणा*

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाकरीता मंडळ सदस्य म्हणून नेमणूकीसाठी 10 मे पूर्वी अर्ज सादर करावेत

सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षम,मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांमध्ये लोकाभिमूख सोयी सुविधांची उभारणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस