vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेचा 6704.43 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महासभेत सादर-स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील यांनी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्याकडे सादर केला अर्थसंकल्प…

नवी मुंबई महानगरपालिकेचा 6704.43 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महासभेत सादर-स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील यांनी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्याकडे सादर केला अर्थसंकल्प…

    नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेचा स्थायी समितीने तयार केलेला सन 2025-26 चा सुधारित आणि सन 2026 – 27 चा मूळ अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती श्री. अशोक पाटील यांनी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्याकडे विशेष सभेमध्ये सादर केला. याप्रसंगी उपमहापौर श्री. दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, सभागृह नेते श्री.सागर नाईक व स्थायी समिती सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समिती सभापती यांनी अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये मांडणारे मनोगत सभागृहापुढे सादर केले.

          महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार आरंभीची शिल्लक रु.1839.58 कोटी व जमा रु. 3991.24 कोटी अशी मिळून एकत्रित जमा रु.5830.82 कोटी आणि रु.4564.98 कोटी खर्चाचे सन 2025-26 चे सुधारित अंदाज.

          तसेच रु. 1265.83 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु.6704.43 कोटी जमा व रु.6689.43 कोटी खर्चाचे आणि रु.15.00 कोटी 2शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2026-27 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेस्तव सादर करण्यात आले.

          स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी दि.06 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येत असल्याचे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी जाहीर केले. यावेळी परिवहन उपक्रम आणि वृक्षप्राधिकरण यांचेही अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

           एक प्रगतीशील, सुरक्षित व सर्वोत्तम शहर निर्माण करण्यासाठी आवश्यक अशा दर्जेदार सुविधा प्रत्येक प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याप्रमाणेच नवी मुंबई शहर देशाच्या नकाशावर ठळकपणे झळकत राहण्यासाठी महत्वपूर्ण असे लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यासाठी ठोस पावले उचलली जातील असा निश्चय स्थायी समितीचे सभापती श्री. अशोक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

00000

संबंधित पोस्ट

गावातील शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते खुले होणार – आजपासून ३१ मार्चपर्यंत जिल्हा महसूल प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम 

vishwatmaklokswamivarta

अक्षय तृतीयेस गोमय उत्पादने वस्तु विक्री दिवस

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील वांद्रे आणि खेरवाडीत मध्यरात्री बेकायदा बाइक रेसिंग; 52 दुचाकी जप्त.

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यात 4 कोटी 80 लाखांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा- सद्यस्थितीत एक टँकर, 7 विहिरींद्वारे पाणीपुरवठा – मागणी व आवश्यकतेनुसार नियोजन 

राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान

मुंबईत कबुतरखाना बंदी कायम – सर्वोच्च न्यायालय