vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जनगणना 2027 मध्ये नागरिक ऑनलाईन पोर्टलव्दारे करू शकतात स्वगणना…

जनगणना 2027 मध्ये नागरिक ऑनलाईन पोर्टलव्दारे करू शकतात स्वगणना…

       नवी मुंबई प्रतिनिधी   भारत सरकारने जनगणना कार्यक्रम 2027 जाहीर केला असून जनगणना कार्यक्रमाचा अंतिम कालावधी ३१ मार्च २०२७ रोजी ००:०० तास आहे. भारत देशात दर दहा वर्षांनी जनगणना करण्याची परंपरा असून पहिली जनगणना १८७२ मध्ये झालेली आहे. २०२७ मधील जनगणना ही १६ वी जनगणना असून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ८ वी जनगणना आहे आणि २१ व्या शतकातील ३ री जनगणना आहे. ही जनगणना दोन स्वतंत्र टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना दि. १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीमध्ये पार पडेल आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी / मार्च २०२७ मध्ये पार पडेल.

          जनगणना २०२७ ही भारतातील डिजीटल पध्दतीने राबविण्यात येणारी पहिली जनगणना असून जनगणना प्रक्रियेच्या आधुनिकीकरणाचे हे एक परिवर्तनशील पाऊल आहे. क्षेत्रीय स्तरावरील प्रगणक व पर्यवेक्षक माहिती संकलनासाठी स्वतःचे मोबाईल उपकरण वापरून माहिती संकलन करणार आहेत व ती माहिती सेंट्रल सर्व्हरवर डिजीटल स्वरूपात नोंद करतील.

          जनगणना 2027 साठी महानगरपालिका आयुक्त हे ‘प्रधान जनगणना अधिकारी’ असतील तसेच उपआयुक्त (परिमंडळ-२) हे ‘शहर जनगणना अधिकारी’ असतील. सर्व विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त हे ‘चार्ज जनगणना अधिकारी’ असतील. त्यांना ‘अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकारी’ हे जनगणना कामी सहाय्य करतील.

          प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यास प्रारंभ होण्यापूर्वी १५ दिवस अगोदर म्हणजेच १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेचा (self Enumeration) पर्याय उपलब्ध असेल. स्वगणना (SE) हा एक नाविन्यपूर्ण आणि नागरिकांना सुलभ व सोयीस्कर पर्याय आहे. तो आपल्या सोयीनुसार सुरक्षित वेब पोर्टल वापरून नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती स्वतःहून ऑनलाईन भरण्याची मुभा देतो. याकरिता नागरिकांनी ऑनलाईन पोर्टल (sc.census.gov.in) ला भेट द्यावी.

          जनगणना पोर्टलमध्ये प्रश्न आणि पर्याय HLO मोबाईल अॅप प्रमाणेच असून वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQS) आणि टूलटीप्सद्वारे उत्तरदात्यांना मदत केली जाते, उपलब्ध पर्यायांपैकी आपला योग्य पर्याय निवडून एकदा कुटुंबाने त्यांची माहिती (SE id) यशस्वीरित्या सादर केली की, त्यांना एक विशिष्ट स्वगणना आयडी प्राप्त होईल. हा एसई आयडी (SE id) दाखवून आपली अचूक व संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. आपली अचूक माहितीच पुढील अनेक वर्षांच्या प्रगतीची दिशा ठरवेल. ही केवळ लोकांची गणना नाही तर हा ‘विकसित भारत २०४७’ चा पाया आहे.

          जनगणना अधिनियम १९४८ नुसार प्रत्येक व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवली जाते. नांवे आणि ओळख उघड केली जात नाही, या माहितीचा वापर कोणत्याही कर आकारणीसाठी किंवा तपासणीच्या उद्देशासाठी केला जात नाही याची नोंद घेऊन सर्व नागरिकांनी जनगणनेमध्ये स्वगणनेचा पर्याय स्विकारावा आणि नोंदणी करावी अथवा आपल्याकडे जनगणना माहिती संकलनासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विशेष बाल पोलीस पथक’ अनिवार्य,बालहक्क संरक्षण आयोगाच्या वैधानिक सूचना; वाढत्या गुन्ह्यांवर कठोर पाऊलराज्यात अल्पवयीन मुला-मुलींसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ : आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती 

शासन आणि लोकप्रतिनिधी मिळून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महापालिका शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साही प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

अमरावतीत होणार आंतरराष्ट्रीय ‘एआय’ परिषद

vishwatmaklokswamivarta

आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवेविल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन..