vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’व ‘यलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’व ‘यलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर, प्रतिनिधी-: भारतीय हवामान विभाग यांनी निर्गमित केलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात दि. २ व ३ एप्रिल २०२६ या कालावधीत तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळे, सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’जारी करण्यात आला आहे. तसेच दि. ४ एप्रिल २०२६ रोजी वीजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मेघगर्जना, वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली थांबू नये; सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये; विद्युतवाहक वस्तूंना स्पर्श टाळावा.मोकळी मैदाने, टॉवर्स, विद्युत खांब, धातूची कुंपणे, ट्रान्सफॉर्मर यांपासून दूर राहावे.जाहिरात फलक (होर्डिंग्ज) जवळ थांबू नये; कोसळण्याचा धोका संभवतो.मोकळ्या जागेत अडकले असल्यास गुडघ्यावर बसून डोके खाली झाकून घ्यावे व जमिनीशी कमी संपर्क ठेवावा.धरण, नदी, कालवे येथे पर्यटनासाठी जाताना विशेष काळजी घ्यावी; पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये.शेतकऱ्यांनी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान टाळण्यासाठी शेतीमालाचे योग्य नियोजन करावे.बाजारात आणलेला किंवा साठवलेला शेतीमाल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी.

जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

 नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२४१-२३२३८४४/ २३५६९४० वर संपर्क साधावा. वादळ, वीज, पाऊस व गारपीट यापासून स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ.

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार

पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच नियम शिथिल करून नागरीकेंद्रित मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

vishwatmaklokswamivarta

लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

vishwatmaklokswamivarta

नंदूरबार जिल्ह्यातल्या देवगुई घाट परिसरात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

vishwatmaklokswamivarta

धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस